ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 08:19 PM2020-07-09T20:19:09+5:302020-07-09T20:25:52+5:30

व्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण करण्यात येईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे.

icmr scientist dr nivedita gupta talk about the corona vaccine 3rd phase trial | ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

Next
ठळक मुद्देव्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण करण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण करण्यात येईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे.

नवी दिल्ली - जगभरात जागतीक महामारी बनलेल्या कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. भारतातही दोन कंपन्यांनी कोरोना व्हॅक्सीन तयार केली आहे. या व्हॅक्सीनचे प्राण्यांवरील परीक्षणही पूर्ण झाल्याचे गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, अद्याप या व्हॅक्सीनचे मानवावरील परीक्षण बाकी आहे. लवकरच या व्हॅक्सीनचे मानवावरील परीक्षणही सुरू होईल, असे आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी म्हटले आहे.

भारत बायोटेक आणि कॅडिला हेल्थकेयर यांनी कोरोनावरील व्हॅक्सीन तयार केली आहे. या व्हॅक्सीनचे परीक्षण तीन टप्प्यांत केले जाईल, असे बोलले जाते. यासंदर्भात आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. निवेदिता गुप्ता यांना विचारण्यात आले असता, त्या म्हणाल्या, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावरील कोरोना व्हॅक्सीनच्या परिणामांवर तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण वलंबून असते. याच वेळी, व्हॅक्सीन परीक्षणाचा तिसरा टप्पा फेटाळला जाऊ शकत नाही, मात्र, हे पहिल्या दोन टप्प्यांवर अवलंबून असेल, असेही त्या म्हणाल्या.

ट्रायलचे ठिकाण निश्चित -
आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी राजेश भूषण यांनी सांगितले, 'या दोन्ही व्हॅक्सीनचे अॅनिमल टॉक्सिसिटीज परीक्षण पूर्ण झाले आहे. हे परीक्षण उंदीर, गिनीपिग आणि ससा यांच्यावर होतो. या दोन्ही परीक्षणाचा डेटा ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) सादर करण्यात आला आहे. यानंतरच दोघांनाही फेज-वनच्या क्लिनिकल परीक्षणाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, फेज-1 आणि फेज-2 मधील परीक्षण कोठे होणार, हेही निश्चित करण्यात आले आहे.'

भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या Covaxin ला फेज-1 आणि फेज-2च्या परीक्षणासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या वतीने मंजुरी मिळाली आहे. व्हॅक्सीन ट्रायलच्या पहिल्या टप्प्यात 375 लोकांवर परीक्षण करण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यात 750 लोकांवर व्हॅक्सीनचे परीक्षण करण्यात येईल. कंपनीने फायनल एनरोलमेन्टसाठी 13 जुलै तारीख निश्चित केली आहे. Zydus Cadila च्या व्हॅक्‍सीनलाही ह्यूमन क्लिनिकल परीक्षणाची परवानगी मिळाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

Web Title: icmr scientist dr nivedita gupta talk about the corona vaccine 3rd phase trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.