चीन PAKला देतोय अत्यंत घातक शस्त्र; जाणून घ्या, कशी आहे भारताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:00 PM2020-07-06T16:00:42+5:302020-07-06T16:44:43+5:30

चीन हल्ला करण्याची क्षमता असलेले चार घातक ड्रोन पाकिस्तानला देण्याच्या तयारीत आहेत. या ड्रोन्ससोबतच तो त्या ड्रोनच्या सहाय्याने डागता येतील, असे शस्त्रही पाकिस्तानला पुरवणार आहे. यासंदर्भात तर्क देताना चीनने म्हटले आहे, की या ड्रोनच्या सहाय्याने आपण पाकिस्तानात त्यांच्या मदतीने होत असलेल्या इकोनॉमिक कॉरिडोर आणि ग्वादर बंदरावरील आपल्या नव्या चीनी नौदलाच्या बेसचे रक्षण करणार आहोत.

बलुचिस्तानच्या नैऋत्य दिशेला ग्वादर आहे. येथे चीन नौदल बेस तयार करण्याच्या तयारीत आहे. एवढेच नाही, तर चीनने पाकिस्तानात इकोनॉमिक कॉरिडोर, पक्के रस्ते आदींवर 60 बिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 4.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीन पाकिस्तानला दोन सिस्टिम देत आहे. प्रत्येक सिस्टिममध्ये एक लॉन्च ग्राउंड स्टेशन आणि ड्रोन असेल. चीन आणि पाकिस्तान मिळून हल्ला करू शकतील, अशा एकूण 48 ड्रोन्सवर काम करत आहेत. या ड्रोन्सचा उपयोग पाकिस्तान आपल्या हवाई दलासाठी करेल. (फोटो - 2017 Paris Air Show)

या ड्रोनचे नाव आहे जीजे-2. हे ड्रोन चीनच्या विंग लूंग-2चे अत्याधुनिक मॉडेल आहे. चीनने विंग लूंग-2 ड्रोन आशियातील अनेक देशांना विकले आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टीट्यूटने दिलेल्या माहितीनुसार, चीनने कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अल्जेरिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमीरातला 2008 ते 2018दरम्यान 163 ड्रोन्स विकले आहेत.

बोलले जाते, की चीनच्या GJ-2 Dronesमध्ये एकाच वेळी 12 मिसाइल्स लावले जाऊ शकतात. हे मिसाइल्स हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी सक्षम आहेत. या ड्रोन्सचा उपयोग सध्या लिबियामध्ये होत आहे. या पैकी चार गेल्या दोन महिन्यात पाडण्यात आले आहेत.(फोटो - Dubai Air Show 2017)

सध्या भारत आणि चीनदरम्यान वाद सुरू आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हल्ला करण्याची क्षमता असलेले ड्रोन देणे ही भारताच्या दृष्टी थोडी चिंतेची गोष्ट नक्कीच आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आता भारताला मिडिया अल्टीट्यूड लॉन्ग अँड्यूरन्सने (MALE) सुसज्ज असलेल्या प्रीडेटर-बी ड्रोनची (Predator-B Drone) योजना पुन्हा सुरू करावी लागू शकते.

प्रीडेटर-बी ड्रोन पाळत ठेवून टार्गेटला उद्ध्वस्त करते. भारतीय नौ-दल प्रीडेटर-बीच्या नौदलाला आवश्यक अशा व्हर्जनसाठी अमेरिकेसोबत बोलणी करत आहे. मात्र, याची किम्मत फार अधिक होत असल्याने, असे ड्रोन घेण्याची योजना तयार होत आहे, जे पाळतही ठेवतील आणि हल्ला करण्यासाठीही सक्षम असतील.

Predator-B ड्रोनलाच एमक्यू-9 रीपरदेखील (MQ-9 Reaper) म्हटले जाते. याच ड्रोनने इराक, अफगानिस्तान आणि सीरियामध्ये दहशतवाद्यांना सळोकी पळो करून सोडले होते. यात 4 हेल-फायर मिसाइल, आणि दोन लेझर गायडेड मिसाइल लावता येऊ शकतात.

भारतात डीआरडीओ आणि काही खासगी कंपन्यादेखील हल्ला करण्यास आणि पाळत ठेवण्यास सक्षण ड्रोन तयार करत आहेत. भारताकडे सध्या उत्कृष्ट असे रुस्तम नावाचे ड्रोन आहे. जे या सर्व ड्रोन्स प्रमाणे काम करू शकते.