शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

मोठा पगार, आलिशान ऑफिस पण सुख नव्हतं! Apple चा कर्मचारी नोकरी सोडून चालवतोय ऑटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 18:26 IST

राकेश आज इलेक्ट्रिक ऑटो चालवतात, पण ही त्यांची हतबलता नसून त्यांचा विजय आहे.

कॉर्पोरेट विश्वातील उंच इमारती, मोठं पॅकेज आणि Apple सारख्या दिग्गज कंपनीत नोकरी... हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो तरुण रात्रंदिवस मेहनत करतात. पण हा झगमगाट नेहमीच समाधान देतोच असं नाही. बंगळुरूचे रहिवासी राकेश बी. पाल यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. राकेश आज इलेक्ट्रिक ऑटो चालवतात, पण ही त्यांची हतबलता नसून त्यांचा विजय आहे.

राकेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple पासून केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या बँका आणि कॉम्प्युटर उत्पादक कंपन्यांसोबत काम केलं. मात्र लवकरच त्यांना कॉर्पोरेट जगतातील 'मॅनिपुलेशन' समजू लागलं. राकेश सांगतात की, "सुरुवातीला सर्व काही छान होतं, पण हळूहळू मला जाणीव झाली की तिथे फक्त लोकांचा वापर केला जातो. मी इतरांना खूश करण्याच्या नादात स्वतःला विसरून गेलो होतो. माझ्याकडे सर्व सुविधा असूनही मनात आनंद का नाही, असा प्रश्न मला पडू लागला."

"मी स्वतःला घरात कैद करून घेतलं”

राकेश यांची आव्हानं केवळ ऑफिसपुरती मर्यादित नव्हती. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक वाईट अनुभव आले. वडील आणि त्यानंतर वैवाहिक जीवनातील कटू अनुभवांमुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना NIMHANS आणि व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. बराच काळ त्यांना औषधांचा आधार घ्यावा लागला. ते म्हणतात, "मी तासन् तास एकाच जागी बसून राहायचो, एकच विचार डोक्यात ६-७ तास चालायचा. मी स्वतःला घरात कैद करून घेतलं होतं."


१५ किलो वजन केलं कमी

राकेश यांनी मानसशास्त्रावर संशोधन सुरू केलं आणि 'डार्क ट्रायड' या संकल्पना समजून घेतल्या. येथूनच त्यांनी स्वतःवर काम करायला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी 'इंटरमिटेंट फास्टिंग'द्वारे १५ किलो वजन कमी केलं. त्यांनी आपल्या बालपणीच्या छंदांना उजाळा दिला आणि 'मुवा थाय' व 'जू-जित्सू' या मार्शल आर्ट्सचे शिक्षण घेतलं. यामध्ये त्यांनी राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकही जिंकलं आणि हा प्रवास अजूनही सुरू आहे.

४ वर्षांचा संघर्ष

कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर राकेश यांनी प्रत्येक छोटं-मोठं काम केलं. त्यांनी फूड डिलिव्हरी केली, बाईक टॅक्सी चालवली आणि एका जिममध्ये साहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करताना शौचालयांची स्वच्छताही केली. राकेश यांच्यासाठी कोणतंही काम लहान नव्हतं, कारण प्रत्येक काम त्यांना 'स्वतःच्या' जवळ नेऊ पाहत होतं. गेल्या ४ वर्षांच्या संघर्षानंतर आता राकेश बंगळुरूच्या रस्त्यांवर स्वतःची इलेक्ट्रिक ऑटो चालवतात. यासोबतच ते डान्स क्लासेस घेतात आणि पेंटिंगचा आपला छंदही जोपासतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Apple Employee Finds Happiness Driving Auto After Quitting High-Paying Job

Web Summary : Rakesh, a former Apple employee, left his corporate job for peace. He battled mental health issues, worked various jobs, and now drives an electric auto in Bangalore, pursuing dance and painting, finding contentment.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Viralसोशल व्हायरल