विहिंप नेत्याने बुरखा घालून केला विनयभंग!

By Admin | Updated: October 11, 2016 04:59 IST2016-10-11T04:59:21+5:302016-10-11T04:59:21+5:30

विश्व हिंदू परिषदेचे अलाहाबाद जिल्हा सचिव अभिषेक यादव जिल्ह्यातील मणी उमरपूर गावातील इमामवाड्यात मुहर्रमनिमित्त शनिवारी रात्री

The VHP leader put a veil and molestation! | विहिंप नेत्याने बुरखा घालून केला विनयभंग!

विहिंप नेत्याने बुरखा घालून केला विनयभंग!

अलाहाबाद : विश्व हिंदू परिषदेचे अलाहाबाद जिल्हा सचिव अभिषेक यादव जिल्ह्यातील मणी उमरपूर गावातील इमामवाड्यात मुहर्रमनिमित्त शनिवारी रात्री भरलेल्या मुहर्रम मजलिसमध्ये बुरखा घालून गेले आणि तेथे त्यांनी काही महिलांचा विनयभंग केल्याचे उघड झाल्यानंतर स्थानिक लौकांनी त्यांना बेदम चोप दिला.
स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनुसार, मजलिसमध्ये आलेल्या काही महिलांना दोन बुरखाधारी व्यक्तींनी नको तेवढ्या सलगीने वागण्यास सुरुवात केल्यावर संशय आला. थोडा वेळ हुज्जत झाल्यावर त्या दोन व्यक्तींना बुरखा काढायला लावला, तेव्हा ते पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी एक अभिषेक यादव होते. त्यांचा दुसरा बुरखाधारी साथीदार गडबड गोंधळाचा फायदा घेऊन पसार झाला. लोकांनी यादव यांना गंभीर जखमी होईपर्यंत चोप दिला. शेवटी काही बुजुर्ग मध्ये पडले व त्यांनी कायदा हातात न घेता यादव यांना पोलिसांच्या हवाली करण्यास लोकांचे मन वळविले. पण रात्री उशिरा गावाकडे परत येत असताना मजलिसच्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी त्यांना अडवून मारहाण केली व लुटले, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: The VHP leader put a veil and molestation!