शहरं
Join us  
Trending Stories
1
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
2
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
3
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
4
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
5
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
6
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
7
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
8
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
9
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
10
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
11
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
12
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
13
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
14
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
15
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
16
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
17
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
18
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
19
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
20
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
Daily Top 2Weekly Top 5

१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 06:09 IST

आयोगाने सोमवारी फेरतपासणी होणार असलेल्या राज्यांची नावे जाहीर केली. त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. 

नवी दिल्ली : १२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा (एसआयआर) दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने सोमवारी केली. अंदमान व निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे ही प्रक्रिया पार पडणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार म्हणाले की, तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ व पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका २०२६मध्ये  होणार आहेत. आसाममधील प्रक्रियेबद्दल स्वतंत्र घोषणा केली जाईल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची हे नववे एसआयआर आहे. आठवे एसआयआर  २००२-२००४ या कालावधीत झाले होते.

महाराष्ट्रात एसआयआर नाहीच

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) तूर्त महाराष्ट्रात न करण्याचा निर्णय घेतल्याने आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी करूनच निवडणुका घ्या, अशी मागणी मविआ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. मात्र, आयोगाने सोमवारी फेरतपासणी होणार असलेल्या राज्यांची नावे जाहीर केली. त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही. 

७ फेब्रुवारीला प्रकाशित अंतिम यादी 

या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात ५१ कोटी मतदारांचा समावेश असेल. ही  प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून सुरू होईल. मसुदा याद्या ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतील. ७ फेब्रुवारीला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Voter list verification in 12 states; Maharashtra not included.

Web Summary : Election Commission announces voter list verification in 12 states from November 4th. Maharashtra excluded, paving way for local elections. Final list on February 7th.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानMaharashtraमहाराष्ट्र