नवरात्रीसाठी ५00 ठिकाणी व्हेज पिझ्झा

By Admin | Updated: September 13, 2016 03:57 IST2016-09-13T03:57:31+5:302016-09-13T03:57:31+5:30

गणेशोत्सवानंतर लवकरच येणारा नवरात्रौत्सव लक्षात घेऊन डॉमिनोज या आंतरराष्ट्रीय पिझ्झा कंपनीने आपल्या ५00 आऊटलेट्समध्ये केवळ शाकाहारी पिझ्झा विकण्याचा निर्णय घेतला आहे

Veja Pizzas in 500 places for Navratri | नवरात्रीसाठी ५00 ठिकाणी व्हेज पिझ्झा

नवरात्रीसाठी ५00 ठिकाणी व्हेज पिझ्झा

नवी दिल्ली : गणेशोत्सवानंतर लवकरच येणारा नवरात्रौत्सव लक्षात घेऊन डॉमिनोज या आंतरराष्ट्रीय पिझ्झा कंपनीने आपल्या ५00 आऊटलेट्समध्ये केवळ शाकाहारी पिझ्झा विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कांदा, लसूणही नसेल. नवरात्रीच्या काळात अधिकाधिक शाकाहारी खवय्यांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास कदाचित कायमस्वरूपी शाकाहारी पिझ्झा तिथे मिळू शकेल. मात्र सध्या नवरात्रीच्या ९ दिवसांतच ५00 आऊटलेट्समध्ये तो मिळेल.
येत्या ५ आॅक्टोबरपासून नवरात्र सुरू होत असून त्या काळात उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतामधील काही शहरांतील ५00 आउटलेट्समध्ये मांसाहारी पिझ्झा अजिबातच मिळणार नाही. नवरात्रीत अनेकांचा उपवास असतो आणि ते मांसाहाराचे सेवन करत नाहीत. तसेच ज्या ठिकाणी मांसाहारी पदार्थ विकले जातात, तेथील शाकाहारी पदार्थही ते खात नाहीत. त्यामुळेच नवरात्रीच्या काळात तिथे मांसाहारी पिझ्झा बनवला आणि विकला जाणार नाही. एवढेच नव्हे, तर पिझझा बेसही वेगळ्या पद्धतीने तयार करण्यात येणार आहे.
केवळ शिंगाड्याच्या पिठाचा वापर करूनच हा पिङझा बनवण्यात येणार आहे. कांदा, लसूण, आले आदींचा यामध्ये वापर करण्यात येणार नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Veja Pizzas in 500 places for Navratri