शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवाना जनधन योजनेशी जोडणार

By admin | Updated: January 11, 2016 03:15 IST

सध्याची वाहनचालकांना परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स) देण्याची प्रक्रिया आमूलाग्र बदलली जाणार असून, ती अधिक तर्कसंगत करताना जनधन योजनेशी जोडली जाणार असल्याचे

नितीन अग्रवाल,  नवी दिल्लीसध्याची वाहनचालकांना परवाने (ड्रायव्हिंग लायसन्स) देण्याची प्रक्रिया आमूलाग्र बदलली जाणार असून, ती अधिक तर्कसंगत करताना जनधन योजनेशी जोडली जाणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या यंत्रणेत डिजिटल तंत्रज्ञानावर तसेच खासगी सहभागावर भर दिला जाणार आहे. बनावट परवान्यांच्या समस्येवर पूर्णपणे मात करण्याचा त्यामागे उद्देश आहे. अर्जदाराला परवाना चाचणी स्वत: उत्तीर्ण करणे बंधनकारक राहील. पूर्णपणे संगणकीय पद्धतीत चुकीला कोणताही वाव नसेल.वाहनचालकाच्या चुकीमुळे प्रत्येक मिनिटाला एक व्यक्ती रस्ते अपघाताला बळी पडते. अशा अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी परवाने जारी करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला जात आहे. नव्या व्यवस्थेत वाहन चालविण्याची चाचणी आणि परवाने रद्द करण्याचे काम वेगवेगळ्या संस्थेकडे दिले जाईल. त्यासाठी खासगी सहभागातून केंद्रे उघडली जातील. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना परीक्षा द्यावी लागेल. संगणकीय पद्धतीने होणाऱ्या परीक्षेच्या वेळी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तपासणी केली जाईल. आधीच निश्चित केलेल्या मापदंडानुसार परीक्षार्र्थींची चाचणी तपासून निकषानुसारच उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरविले जाईल. डाटा अधिकृत प्राधिकरणाकडे पाठवल्यानंतर ठरावीक मुदतीत उमेदवाराला परवाना मिळेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.