शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थ मांसाहारी की शाकाहारी हे कळणे हक्कच; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 06:12 IST

आपण काय खातो हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकास संपूर्ण अधिकार आहे: सर्वोच्च न्यायालय

एखादा खाद्यपदार्थ बनविताना त्यात कोणते अन्नघटक वापरले आहेत, याची संपूर्ण माहिती उत्पादक कंपनीने दिली पाहिजे. त्यामुळे हा पदार्थ शाकाहारी आहे की मांसाहारी, हे लोकांना सहजपणे ओळखता येईल, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. आपण काय खातो हे जाणून घेण्याचा प्रत्येक नागरिकास संपूर्ण अधिकार आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. बिपीन संघी व न्या. जसमित सिंह यांनी म्हटले आहे की, एखादा खाद्यपदार्थ कोणत्या अन्नघटकांपासून बनला आहे, इतकीच माहिती न देता, ते घटक कोणत्या प्राण्याचे किंवा रोपाचे आहेत, याचाही तपशील उत्पादक कंपन्यांनी दिला पाहिजे. हा पदार्थ नैसर्गिक पद्धतीने बनविला की प्रयोगशाळेत, याचीही माहिती कंपन्यांनी द्यावी.

खाद्यपदार्थ ज्या घटकांपासून बनविले आहेत, त्यानुसार त्यांच्यावर शाकाहारी किंवा मांसाहारी असा स्पष्ट उल्लेख करण्याचा आदेश संबंधित कंपन्यांना द्यावा, अशी याचिका राम गौ रक्षा दलाने उच्च न्यायालयात केली होती. त्यावरील सुनावणीप्रसंगी दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, खाद्यपदार्थ बनविताना वापरलेले घटक, त्यांचे मूळ याबद्दलची सविस्तर माहिती यापुढे कंपन्यांनी न दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.इन्स्टन्ट नूडल्समध्ये डिसोडियम इनोसिनेट हा वापरण्यात येणारा घटक मांस किंवा माशापासून बनवितात. मात्र ती माहिती ग्राहकांना नीट दिली जात नाही. तरीही काही कंपन्या हे खाद्यपदार्थ शाकाहारी असल्याचे सांगतात. या पद्धतीची लबाडी कोणीही करू नये, म्हणून दक्ष राहणे आवश्यक आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.  

शाकाहारी लोकांची कुचंबणा कोणत्या पदार्थांमध्ये मांसाहारी घटक वापरले जातात, याची यादी संबंधित विभागाचे अधिकारी करू शकलेले नाहीत. अशा गोष्टींमुळे नागरिकांच्या विशेषत: शाकाहारी पदार्थच खाणाऱ्या नागरिकांच्या हक्कांवर गदा येत आहे, असेही दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयfoodअन्न