Ved Marwah, former Police Commissioner of Delhi passed away in goa | दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त, तीन राज्यांचे माजी राज्यपाल वेद मारवाह यांचे निधन

दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त, तीन राज्यांचे माजी राज्यपाल वेद मारवाह यांचे निधन

म्हापसा:  दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त आणि त्यानंतर मणिपूर, मिझोराम आणि झारखंडचे राज्यपाल राहिलेले वेद मारवाह यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 

मारवाह यांच्या निधनाची माहिती गोवा पोलिसांनी टि्वटरवर दिली आहे. गोव्यातील म्हापशाच्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलीस दलाच्या एका महान नेतृत्वाच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांनी पोलिस दलाचे आव्हानात्मक काळात नेतृत्व केले. तसेच तीन राज्यांना राज्यपालाच्या रुपामध्ये मार्गदर्शन केले, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ved Marwah, former Police Commissioner of Delhi passed away in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.