पिंपरी बुद्रुक येथे विविध क्रीडा स्पर्धा

By Admin | Updated: August 31, 2015 21:30 IST2015-08-31T21:30:33+5:302015-08-31T21:30:33+5:30

राजगुरुनगर : पिंपरी बुद्रुक येथील सुमंत विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेऊन आणि खेळाडूंचा सत्कार करून साजरा करण्यात आला.

Various sports competitions at Pimpri Budruk | पिंपरी बुद्रुक येथे विविध क्रीडा स्पर्धा

पिंपरी बुद्रुक येथे विविध क्रीडा स्पर्धा

जगुरुनगर : पिंपरी बुद्रुक येथील सुमंत विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेऊन आणि खेळाडूंचा सत्कार करून साजरा करण्यात आला.
भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. पिंपरीच्या श्रमसाफल्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुमंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने यानिमित्त कबड्डी, स्लो सायकल, अर्ध मॅरेथान या स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच क्रीडा प्रदर्शन आणि क्रीडा व्याख्यान आयोजित केले होते.
श्रमसाफल्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबाजी ठाकूर, मानद सचिव कैलास ठाकूर, कार्याध्यक्ष दत्तात्रय ठाकूर, संचालक अरुण वाळूंज, विद्यालयाचे प्राचार्य पी. एन. कर्डिले, एम जि करमारे, पी. बी. नेवसे, एस. एस. केदारे या वेळी उपस्थित होते. क्रीडा शिक्षक दिलीप ढमाले यांनी संयोजन आणि प्रास्ताविक केले.
फोटो : पिंपरी येथील सुमंत विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्लो सायकल स्पर्धा घेण्यात आली.

Web Title: Various sports competitions at Pimpri Budruk