शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:16 IST

एका जोडप्याने भरधाव वेगात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनसमोर स्वतःला झोकून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हरिद्वारच्या ज्वालापूरमध्ये एका जोडप्याने भरधाव वेगात येणाऱ्या वंदे भारत ट्रेनसमोर स्वतःला झोकून, आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्य रस्त्यालागत असणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस लखनौवरून देहरादूनला जात होती. हा अपघात घडला त्यावेळी या ट्रेनचा वेग ताशी ९० किलोमीटर होता. ट्रेन भरधाव वेगात निघून गेल्यानंतर या जोडप्याच्या मृतदेहाचे तुकडे ट्रॅकवर आढळले. 

पोलिसांनी या महिला आणि पुरुषाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश मिळू शकले नाही. दोघांच्या आत्महत्येचं कारण देखील अद्याप समजलेलं नाही. पोलीस या मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

वंदे भारत समोर मारली उडीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२३० वाजताच्या सुमारास वंदे भारत एक्सप्रेस लखनौहून देहरादूनला जात होती. यावेळी  ज्वालापूरमधील सेक्टर २ बॅरियरजवळ मुख्य रस्त्याला लागून असलेल्या रेल्वे ट्रॅकवर एक महिला आणि एक पुरूष उभे होते. ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकताच पुरुष लगेच रेल्वे ट्रॅकवर झोपला. तर, ट्रेन जवळ येताच त्याच्यासोबतची महिलाही रुळावर झोपली. हे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. मात्र, काही कळायच्या आताच वंदे भारत ट्रेन दोघांना उडवून निघून गेली. ट्रेन गेल्यानंतर काही सेकंदातच लोकांनी रेल्वे रुळावर धाव घेतली. मात्र, दोघांच्या शरीराचे तुकडे झाले होते. 

मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू 

सदर घटनेची माहिती मिळताच अमरजीत सिंह, जीआरपी स्टेशन प्रमुख अनुज सिंह आणि इतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्रत्यक्षदर्शींकडून घटनेची माहिती गोळा केली. पोलिसांनी मृतदेहांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, पण यात त्यांना यश मिळाले नाही. दोघांची ओळख पटवता येईल, असे कोणतेही कागदपत्रे किंवा मोबाईल फोन, आधार कार्ड इत्यादी वस्तू जवळपास आढळल्या नाहीत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवले आहेत.

या घटनेत मृत पावलेल्या जोडप्याचे वय साधारण पन्नाशीच्या आसपास असावे, असे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेवेळी ट्रेन ताशी ९० किलोमीटर वेगाने धावत असल्याने ती थांबवणे कठीण असल्याचे, वंदे भारत ट्रेनचे लोको पायलट ब्रिजमोहन मीना यांनी म्हटले. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून, मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.   

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसCrime Newsगुन्हेगारीIndiaभारत