शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारत गारठला उत्तर प्रदेशात आठ मृत्युमुखी: जनजीवन प्रभावित

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे़ उत्तराखंडातील उंच भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे शेजारच्या उत्तर प्रदेशात थंडीची प्रचंड लाट असून जनजीवन गारठून गेले आहे़ गत २४ तासांत राज्यात थंडीने आठ जणांचा बळी घेतला आहे़

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीचा प्रकोप कायम आहे़ उत्तराखंडातील उंच भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे शेजारच्या उत्तर प्रदेशात थंडीची प्रचंड लाट असून जनजीवन गारठून गेले आहे़ गत २४ तासांत राज्यात थंडीने आठ जणांचा बळी घेतला आहे़
दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आदी राज्यांत थंडीचा कडाका कायम आहे़ गोठवणारी थंडी आणि दाट धुके यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे़ उत्तर प्रदेशात शनिवारी अनेक भागात लोकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला़ जालौन जिल्ह्यातील कदौर भागात दाट धुक्यांमुळे एक ट्रक कालव्यात जाऊन कोसळला़ या अपघातात, सहा जण ठार तर ३४ जण जखमी झालेत़ कुशीनगर जिल्ह्यातही दाट धुक्यांमुळे समोर दिसत नसल्याने अपघात होऊन दोघे ठार झाले़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत गोरखपूर, वाराणसी, मुरादाबाद, अलाहाबाद आणि लखनौच्या रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे़
पंजाब आणि हरियाणातही थंडीची लाट कायम आहे़ थंडीमुळे जनजीवन प्रभावित झाले आहे़ दाट धुक्यामुळे दृश्यता कमी झाल्याने चंदीगड विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत़ अनेक रेल्वेगाड्यांचाही खोळंबा झाला आहे़