शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 10:49 IST

Marriage Registration Rules Change: फोटो किंवा लग्नपत्रिका लग्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार उत्तर प्रदेश सरकारने विवाह नोंदणी प्रक्रियेत बदल केला. नव्या नियमानुसार, विवाह नोंदणीसाठी लग्नातील व्हिडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य असेल. त्यामुळे घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी विवाह नोंदणी करणे आता कठीण होणार आहे. दरम्यान, जबरदस्तीने विवाह केल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले. 

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून आयजी रजिस्ट्रेशनने विवाह नोंदणीबाबत नवीन अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. उत्तर प्रदेशात यापुढे पुरावे आणि साक्षीशिवाय लग्नाला कायदेशीर दर्जा मिळणार नाही. आयजी स्टॅम्प पुष्पेंद्र कुमार यांनी माहिती दिली की, शुक्रवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश सरकारने याबाबत आदेश जारी केले असून नवे नियम शनिवारपासून लागू झाले आहेत. 

नव्या नियमानुसार, लग्नाचा फोटो किंवा लग्नपत्रिका लग्नाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. लग्न लावणाऱ्या भटजीची तोंडी साक्ष आणि प्रतिज्ञापत्र अनिवार्य असेल. नोंदणीच्या वेळी भटजींना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल आणि त्यांना त्यांचे नाव, पत्ता, आधार कार्डची प्रत, वैध ओळखपत्र, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सादर करावा लागेल.

प्रत्येक विवाह नोंदणी कार्यालयात एक रजिस्टर ठेवले जाईल, ज्यामध्ये नोंदणीकृत विवाहांची मासिक नोंद तयार केली जाईल, ज्यात सर्व माहिती देणे बंधनकारक असेल. हे रेकॉर्ड सहाय्यक महानिरीक्षकांनी प्रमाणित करावे लागेल. विवाह नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करणे, कुटुंबाची संमती सुनिश्चित करणे आणि फसवणुकीच्या घटना रोखणे, हे नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :Courtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न