शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh Assembly Election: भाजपच्या यादीत ओबीसींना झुकते माप; पहिल्या यादीत १०७ जणांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 10:16 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ गाेरखपूर शहर या मतदार संघातूनच निवडणूक लढतील, हे आज स्पष्ट झाले आहे. या यादीत १९ अनुसूचित जातीचे तर १० महिलांना भाजपने उमेदवारी दिली आहे. एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली नाही.

- सुरेश भुसारीनवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी नेते माेठ्या प्रमाणावर भाजपला रामराम करत असल्याचा परिणाम शनिवारी जाहीर केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपच्या यादीवर दिसून आला. भाजपच्या १०७ उमेदवारांमध्ये तब्बल ४४ उमेदवार ओबीसी आहेत.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ गाेरखपूर शहर या मतदार संघातूनच निवडणूक लढतील, हे आज स्पष्ट झाले आहे. या यादीत १९ अनुसूचित जातीचे तर १० महिलांना भाजपने उमेदवारी दिली आहे. एकाही मुस्लिम उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिलेली नाही.पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व महासचिव अरुण सिंग यांनी घाेषणा केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून आमदारांच्या गळतीचा परिणाम भाजपच्या यादीवर स्पष्टपणे दिसून आला. अर्ध्यापेक्षा अधिक विद्यमान आमदारांची नावे कापली जाणार, असा कयास लावला जात हाेता. परंतु, भाजपमध्ये गळती सुरू झाल्याने पक्षश्रेष्ठींनी ही टक्केवारी केवळ २०वर आणली. तसेच या यादीवर ओबीसी उमेदवारांची स्पष्ट छाप दिसून आली.               दरम्यान, घाेषित केलेल्या यादीत गाेरखपूरमधून याेगी आदित्यनाथ यांचे नाव आहे. यामुळे मथुरामधून ते निवडणूक लढवतील, या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मथुरामधून विद्यमान आमदार श्रीकांत वर्मा यांनाच उमेदवारी दिली आहे. प्रयाेगराज जिल्ह्यातील सिराथू मतदार संघातून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद माैर्य यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.नाकारलेले उमेदवारभाजपने उमेदवारी कापलेल्यांमध्ये विनयकुमार कश्यप, हरीओम शर्मा, रामवीर सिंग, सत्यप्रकाश अग्रवाल, रमेशचंद्र ताेमर, कमलसिंग मलिक, विमला सिंग साेलंकी, विरेंद्र सिंग सिराेही, अनिता सिंग राजपूत, विरेंद्र सिंग, दलवीर सिंग या प्रमुखांचा समावेश आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा