शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

'आम्हीच भारत आणि पाकिस्तान यांच्यावर युद्धविरामासाठी दबाव आणला', डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 21:07 IST

Donald Trump On India-Pakistan Ceasefire: अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला त्यांच्यासोबतचा व्यापार संपवण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही देशांनी माघार घेतली आणि युद्धविरामाला सहमती दर्शवली, असेही ट्रम्प म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात सैन्य कारवाया केल्यानंतर हा तणाव आणखी वाढला. त्यानंतर शनिवारी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला सहमती दिली. मात्र, याचे श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: घेतले. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्यावर युद्धविरामासाठी दबाव आणला, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला त्यांच्यासोबतचा व्यापार संपवण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन्ही देशांनी माघार घेतली आणि युद्धविरामाला सहमती दर्शवली, असेही ट्रम्प म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे भरपूर अण्वस्त्रे आहेत. मला वाटते की आम्ही अणुयुद्ध रोखले आहे.  अन्यथा या युद्धात लाखो मारले गेले असते. मी उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचे त्यांच्या कामाबद्दल त्यांचे आभार मानू इच्छतो. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानसोबतचा व्यापार संपुष्टात आणण्याची धमकी देऊन दोन्ही देशांवर दबाव आणला. जर त्यांना अमेरिकेसोबत व्यापार सुरू ठेवायचा असेल तर, त्यांना युद्ध थांबवावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांनी  तात्काळ युद्धविरामाला सहमती दर्शवली, असे ट्रम्प म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचा उल्लेख सर्वप्रथम ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या केला. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एक निवेदन जारी केली. भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी पूर्ण युद्धविरामाला सहमती दर्शवली असून तटस्थ ठिकाणी विस्तृत चर्चा सुरू करतील, असे स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान