शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 18:45 IST

US Court Summons India : अमेरिकेतील कोर्टाने केंद्र सरकारसह अजित डोवाल आणि माजी रॉ प्रमुखांना समन बजावले आहे.

US Court Summons India : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकन कोर्टाने भारत सरकार आणि उच्च अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहेत. यावर आता केंद्राची तीव्र प्रतिक्रिया आली असून, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी एका निवेदनात या आरोपांचे खंडन केले आहे. हा विशेष खटला दाखल झाल्यामुळे याबाबतचे आमचे मत बदलणार नाही, असेही ते म्हणाले. 

मिसरी पुढे म्हणाले की, मी हे तथ्य अधोरेखित करू इच्छितो की, ही व्यक्ती (पन्नू) ज्या संघटनेचे नेतृत्व करते, ती एक बेकायदेशीर संघटना आहे, ज्यावर UAPA अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. ही संघटना देशविरोधी आणि विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, हे प्रकरण पूर्णपणे अयोग्य आणि सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे. आम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहोत. उच्चस्तरीय चौकशीही सुरू करण्यात आली असून सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

कुणी बजावला समन ?न्यूयॉर्कच्या एका न्यायालयाने भारत सरकार, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, माजी रॉ प्रमुख सामंत गोयल यांना समन्स बजावले आहे. हत्या प्रकरणातील आरोपी निखिल गुप्ता आणि विक्रम यादव यांनाही समन्स पाठवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये पन्नूच्या हत्येचा कट रचल्याबद्दल अमेरिकन सरकारच्या विनंतीवरून निखिल गुप्ता याला चेक रिपब्लिकमध्ये अटक करण्यात आली होती.

एप्रिल 2024 मध्ये द वॉशिंग्टन पोस्टने अहवाल दिला होता की, भारताच्या संशोधन आणि विश्लेषण विंग (RAW) चे अधिकारी विक्रम यादव या कटात सामील होते, तसेच RAW प्रमुख सामंत गोयल यांनी या ऑपरेशनला मान्यता दिली होती. मात्र, पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय दलालांचा सहभाग असल्याचा दावा पूर्णपणे अयोग्य आणि निराधार असल्याचे सांगत केंद्राने हा अहवाल फेटाळला.

कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे आणि तो दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात वॉन्टेड आहे. पन्नू हा खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिस (SFJ) चा प्रमुख असून, पेशाने वकील आहेत आणि स्वतंत्र शीख राष्ट्र खलिस्तानच्या मागणीसाठी जनमत चाचणीचा प्रमुख संयोजक आहेत. हे सार्वमत कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या भारतीय डायस्पोरा असलेल्या देशांमध्ये आयोजित केले गेले आहे. पन्नूने 2007 मध्ये SFJ ची स्थापना केली आणि तो खलिस्तानचा कट्टर समर्थक बनला.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयTerrorismदहशतवाद