शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

उरी हल्ल्याचा जगभर निषेध; दहशतवाद्यांवर कारवाई हवीच

By admin | Updated: September 20, 2016 05:53 IST

प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : प्रत्येक देशाने आपल्या भूमीवर राहून इतर देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांवर परिणामकारक कारवाई केलीच पाहिजे, असे फ्रान्सने सोमवारी म्हटले. काश्मीर प्रश्नावर शांततामय मार्गांनी तोडगा शोधणे महत्वाचे आहे, असे फ्रेंचच्या परराष्ट्र मंत्रालयाने येथे निवेदनाद्वारे म्हटले. फ्रान्सने उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. दहशतवादाविरोधातील लढाईत फ्रान्स भारताबरोबर आहे, असे त्यात नमूद करण्यात आले. पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी उरी येथील हल्ल्याचा निषेध करून अपराध्यांना कठोर शिक्षा होईल व पुन्हा स्थैर्य निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.काश्मीर खोऱ्यात वाढता हिंसाचार आणि तापत जाणाऱ्या वातावरणाबद्दल चीनने सोमवारी चिंता व्यक्त केली. भारत आणि पाकिस्तानने मतभेद संवादाद्वारे व परस्परांत सहकार्य वाढवून सोडवावेत, असे आवाहनही केले. उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्हाला धक्का बसल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आमचा विरोध असून आम्ही दहशतवादाचा निषेध करतो. काश्मीर खोऱ्यात वाढलेला हिंसाचार आणि तापमान याची आम्हाला काळजी वाटते. संबंधित देश आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी संवाद व सल्लामसलतीद्वारे प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे. त्यांना आपापसात दहशतवाद विरोधातील प्रयत्नांचे सहकार्यही वाढवावे लागेल. फक्त याच मार्गाने त्या भागात शांतता आणि सुरक्षितता स्थापन होईल, असेही कांग म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>रशियाने रद्द केल्या पाकसोबतच्या संयुक्त कवायती पाकिस्तान आणि रशियाच्या २४ सप्टेंबरपासून पाकमध्ये सुरू होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायती रद्द करण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. उरी हल्ल्याच्या आधीच भारताने या कवायतींबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र उरी हल्ल्यानंतर रशियाने त्या रद्द करण्याचे ठरविले. पाकला एकटे पाडण्यासाठी भारतातर्फे जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला रशियाच्या निर्णयाने यश मिळाले आहे.