शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेस-लोकलची समोरासमोर धडक, अनेक प्रवासी जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 13:37 IST

दोन ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देतेलंगणामध्ये दोन ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे. पाच जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातग्रस्त दोन ट्रेनपैकी एक एमएफटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस होती.

हैदराबाद - तेलंगणामध्ये दोन ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे. कचेगुडा रेल्वे स्थानकात सोमवारी (11 नोव्हेंबर) सकाळी ही घटना घडली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

दक्षिण मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघातग्रस्त दोन ट्रेनपैकी एक एमएफटीएस तर दुसरी इंटरसिटी एक्स्प्रेस होती. ट्रेन एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाल्याने ट्रेनचे काही डब्बे रुळावरून घसरले. इंटरसिटी एक्स्प्रेस ही कचेगुडा रेल्वे स्थानकात ज्या प्लॅटफॉर्मवर थांबली होती. त्याच प्लॅटफॉर्मवर एमएफटीएम ट्रेन आली आणि या दोन्ही ट्रेनची धडक झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

लिंगमपल्ली-फलकनुमा ट्रेनचे तीन डब्बे तर कुर्नुल सिटी-सिकंदराबाद एक्स्प्रेसचे चार डब्बे हे धडक झाल्यावर रुळावरून घसरले आहेत. घसरलेले डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सध्या रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अशी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. 

टॅग्स :Telanganaतेलंगणाrailwayरेल्वेAccidentअपघात