Himachal Accident: हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एका भीषण रस्ते अपघातात दोन व्यक्तींचा करुण अंत झाला. भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळली आणि क्षणार्धात कारने पेट घेतला. या आगीत कारमधील एका प्रवाशाचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर दुसरा व्यक्ती कारमधून बाहेर फेकल्या गेल्याने जागीच ठार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात ऊना-धर्मशाला हायवेवर चिंतपूर्णी जवळील भरवाईं भागात दुपारी ३:३० च्या सुमारास घडला. मृत व्यक्ती पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी असल्याचे समजते. ते माता चिंतपूर्णीचे दर्शन घेऊन आपल्या कारने परतत असताना हा अपघात झाला.
CCTV फुटेजमध्ये कैद झाला थरार
या अपघाताचे एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये, अपघात होण्यापूर्वीच भरधाव कारमधून आगीच्या ज्वाळा निघत होत्या. वळणावर पोहोचण्यापूर्वीच चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या १५० फूट खोल दरीत कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरीत कोसळण्यापूर्वी मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला होता.
टायर फाटल्याने अपघात झाल्याची शक्यता
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कारचा टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले असावे आणि त्यामुळेच घर्षण होऊन कारने पेट घेतला असावा. दरीत कोसळल्यानंतर कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
बचावकार्य आणि तपास
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाला एक मृतदेह कारच्या बाहेर पडलेला आढळला. तर दुसरा मृतदेह कारमध्ये पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळावरून पोलिसांना एक आधार कार्ड सापडले आहे, ज्यावर लुधियाना येथील ताजपूर रोडचा पत्ता आहे. कारच्या रजिस्ट्रेशनवरून मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. "आम्ही या प्रकरणाची नोंद केली असून मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक तपासणीनंतरच आगीचे आणि अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल," अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
Web Summary : A car accident in Himachal Pradesh's Una district killed two. A tire burst caused the car to plunge into a gorge and catch fire, killing one passenger instantly. The victims were from Ludhiana, returning from a pilgrimage.
Web Summary : हिमाचल प्रदेश के ऊना जिले में एक कार दुर्घटना में दो लोगों की मौत हो गई। टायर फटने से कार खाई में गिर गई और आग लग गई, जिससे एक यात्री की मौके पर ही मौत हो गई। पीड़ित लुधियाना से थे, जो तीर्थयात्रा से लौट रहे थे।