Dollar Vs Rupees: भारतीय परकीय चलन बाजारामध्ये आज त्या वेळी खळबळ उडाली जेव्हा अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी ₹९५.२० या पातळीवर कोसळला. जागतिक बाजारपेठेत डॉलरची वाढती मजबुती आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अचानक वाढ यामुळे भारतीय चलनाची ऐतिहासिक घसरण झाली. रुपयानं ₹९५ ची पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाच्या खिशावर मोठ्या संकटाचे ढग जमा झाले आहेत.
रुपयातील या मोठ्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $१२० च्या पार जाणं हे सर्वात प्रमुख कारण आहे. अमेरिकेनं इराणवर वाढवलेला दबाव आणि मध्य-पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे तेलाच्या किमतीचा भडका उडालाय. भारत आपल्या गरजेच्या ८०% पेक्षा जास्त कच्चे तेल आयात करत असल्यानं डॉलरची मागणी वाढली, परिणामी रुपयाचं मूल्य घटत आहे. तसंच, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्यानं परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या (FPI) या विक्रीमुळे रुपयावरील दबाव अधिक वाढलाय.
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
सामान्य माणसावर कसा होईल परिणाम?
पेट्रोल-डिझेलची किंमत : कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताला आता जास्त डॉलर मोजावे लागतील, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती : चीन आणि इतर देशांतून आयात होणारे मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही यांसारखी गॅजेट्स महाग होतील.
परदेशातील शिक्षण आणि पर्यटन : परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्या लोकांचं बजेट १०-१५% पर्यंत वाढू शकते, कारण त्यांना आता डॉलर खरेदी करण्यासाठी जास्त रुपये द्यावे लागतील.
खाद्यपदार्थांच्या किमती : खाद्यतेल आणि डाळींची आयात महाग झाल्यामुळे स्वयंपाकघराचं बजेटही बिघडू शकतं.
शेअर बाजारामध्येही भीतीचे वातावरण
रुपयाच्या या घसरणीचा परिणाम दलाल स्ट्रीटवरही पाहायला मिळाला. आज सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली. रुपयाच्या कमकुवतपणामुळे कंपन्यांचा इनपुट कॉस्ट वाढेल आणि त्यांच्या नफ्यात घट होईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे.
Web Summary : The Indian Rupee plummeted to a historic low of ₹95.20 against the US dollar amid rising crude oil prices and global market volatility. This depreciation impacts petrol prices, imported electronics, foreign education costs, and stock market sentiment, raising concerns for the Indian economy.
Web Summary : कच्चे तेल की बढ़ती कीमतों और वैश्विक बाजार की अस्थिरता के बीच भारतीय रुपया डॉलर के मुकाबले रिकॉर्ड निचले स्तर ₹95.20 तक गिर गया। इस गिरावट से पेट्रोल की कीमतों, आयातित इलेक्ट्रॉनिक्स, विदेशी शिक्षा लागत और शेयर बाजार पर असर पड़ेगा, जिससे भारतीय अर्थव्यवस्था के लिए चिंता बढ़ गई है।