नवी दिल्ली : युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, त्याचा थेट फटका भारतीय तेल कंपन्यांना बसत आहे. सध्या सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर १४ रुपये, तर डिझेलवर प्रतिलिटर १८ रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दर स्थिर ठेवल्यामुळे कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होत असून, लवकरच सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
‘इक्रा’च्या अहवालानुसार, दोन महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७०-७२ डॉलरच्या आसपास होती. मात्र, युद्धामुळे ही किंमत १२०-१२५ डॉलरपर्यंत झेपावली. दरम्यान, देशांतर्गत किरकोळ इंधनदर मोठ्या प्रमाणावर वाढवले गेले नसल्याने कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे आल्याने इंधन, खते आणि रसायनांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
मुख्य परिणाम काय होणार?
सीएनजी महागणार : नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने सीएनजीचा नफा घटण्याची शक्यता आहे. यामुळे सीएनजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.
उद्योगांवर खर्चाचा ताण : जगातील २० टक्के तेल आणि गॅस वाहतूक याच मार्गाने होते. युद्धजन्य परिस्थितीमुळे हा मार्ग विस्कळीत झाल्याने पुरवठा घटला आहे. परिणामी, संबंधित उद्योगांवर खर्चाचा ताण वाढत आहे.
महागाई वाढणार: रसायने आणि पॉलिमरच्या किमती वाढल्याने उत्पादनखर्च वाढून महागाई वाढू शकते. उच्च कच्चा माल आणि ऊर्जाखर्चामुळे खत, पेट्रोकेमिकल आणि सिटी गॅस वितरण क्षेत्रांवरही परिणाम दिसत आहे. युरिया उत्पादनासाठी लागणाऱ्या गॅसच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
खते व गॅसही महागणार?पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर स्वयंपाकाच्या गॅसवरही सरकारला चालू आर्थिक वर्षात ८०,००० कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. खत अनुदानाचा बोजा वाढून तो २.२५ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे केवळ वाहनधारकांचेच नव्हे, तर शेतकऱ्यांचे आणि गृहिणींचेही बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत.
Web Summary : Oil companies face huge losses due to soaring crude oil prices. Fuel price hikes are expected, impacting CNG, industries, and potentially triggering inflation. Fertilizer and gas prices are also set to rise, burdening consumers.
Web Summary : कच्चे तेल की बढ़ती कीमतों के कारण तेल कंपनियों को भारी नुकसान हो रहा है। ईंधन की कीमतों में वृद्धि की उम्मीद है, जिससे सीएनजी, उद्योग प्रभावित होंगे और संभावित रूप से मुद्रास्फीति शुरू हो सकती है। उर्वरक और गैस की कीमतें भी बढ़ने वाली हैं, जिससे उपभोक्ताओं पर बोझ पड़ेगा।