शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
4
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
5
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
6
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
7
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
8
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
9
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
10
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
11
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
12
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
13
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
14
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
15
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
16
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
17
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
18
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
19
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
20
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
Daily Top 2Weekly Top 5

'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:22 IST

Keshav Upadhye News: पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची आपली यादी नुकतीच प्रसिद्ध केली. तसेच दीर्घकाळ भाजपाचं प्रवक्तेपद सांभाळणारे माधव भंडारी आणि केशव उपाध्ये या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा आमदारकीने हुलकावणी दिली होती.

पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची आपली यादी नुकतीच प्रसिद्ध केली. तसेच दीर्घकाळ भाजपाचं प्रवक्तेपद सांभाळणारे माधव भंडारी आणि केशव उपाध्ये या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा आमदारकीने हुलकावणी दिल्याचे स्पष्ट झाले. बरीच वर्षे पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडून भाजपाला योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना संधी नाकारण्यात आल्याने विरोधकांकडून भाजपाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. सोबतच केशव उपाध्ये आणि माधव भांडारी यांच्यावरही खोचक टीका होत आहे. त्याला आता केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावरून उत्तर दिलं आहे.

विधान परिषदेच्या आमदारकीची संधी हुकल्याच्या पार्श्वभूमीवर केशव उपाध्ये यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ''की घेतले न हे व्रत अंधतेने…” असे लिहून शेअर केलेल्या पोस्टमध्ये केशव उपाध्ये यांनी लिहिले की, २५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही. ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो. अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या. “संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…”हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी संधी मिळालेल्या उमेदवारांचं अभिनंदन करताना उपाध्ये यांनी लिहिले की, परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! बाकी, मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा!, असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Keshav Upadhye's poignant post after missing MLC opportunity; responds to critics.

Web Summary : BJP's Keshav Upadhye missed MLC nomination again. He responded to critics, emphasizing dedication to ideology. He congratulated selected candidates and wished well to his trolls.
टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024BJPभाजपा