Stock Market Crash: शेअर बाजारगुंतवणूकदारांसाठी आजची सकाळ एखाद्या वाईट स्वप्नासारखी ठरली आहे. जागतिक बाजारातून मिळणारे संमिश्र संकेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली अचानक वाढ यामुळे भारतीय शेअर बाजाराचं कंबरडं मोडलं. गुरुवारी बाजार उघडताच हाहाकार माजला आणि पाहता पाहता गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहा झाले.
आठवड्याच्या चौथ्या व्यापारी दिवशी म्हणजेच ३० एप्रिल रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांची सुरुवात लाल चिन्हाच्या गडद छायेत झाली. सेन्सेक्स सुमारे ९१०.०३ अंक म्हणजेच १.४७% च्या भारी घसरणीसह ७६,५८६.३३ च्या पातळीवर आला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील २८२.८० अंक किंवा १.१७% घसरून २३,८९४.८५ च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. विशेष म्हणजे, एका आठवड्यानंतर निफ्टीनं पुन्हा २४,००० ची महत्त्वाची पातळी तोडली आहे, ज्यामुळे ट्रेडर्समध्ये भितीचं वातावरण आहे.
आयटी बँकिंग क्षेत्रात मोठी विक्री
बाजाराच्या स्थितीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, व्यवहाराच्या सुरुवातीलाच घसरण होणाऱ्या शेअर्सची संख्या वधारणाऱ्या शेअर्सपेक्षा खूप जास्त होती. आकडेवारीनुसार, सुमारे १,३७१ शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली, तर केवळ ८७३ शेअर्समध्ये वाढ झाली. सुमारे १३७ शेअर्सच्या स्थितीत कोणताही बदल झाला नाही. प्रामुख्याने बँकिंग, ऑटो आणि आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली, ज्यामुळे बाजार स्वतःला सावरू शकला नाही.
बाजारातील या मोठ्या घसरणीचे मुख्य कारण कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ मानली जात आहे. अमेरिकेनं इराणवर दबाव वाढवल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलर्सच्या पार पोहोचल्या आहेत. भारत आपल्या गरजेचा बहुतांश भाग तेल आयातीतून पूर्ण करतो, अशा परिस्थितीत तेल महाग झाल्यामुळे देशाची व्यापार तूट आणि महागाई वाढण्याची भीती सतावत आहे. याच भीतीपोटी गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री सुरू केली आहे.
Web Summary : Indian stock markets crashed as crude oil prices soared amid mixed global cues. Sensex fell by 900 points, and Nifty breached 24,000. Banking, IT, and auto sectors witnessed heavy selling due to concerns over rising inflation and trade deficit fueled by higher oil prices.
Web Summary : कच्चे तेल की कीमतों में उछाल के बीच भारतीय शेयर बाजार धराशायी हो गया। सेंसेक्स 900 अंक गिरा, निफ्टी 24,000 के नीचे। तेल की कीमतों में वृद्धि से मुद्रास्फीति और व्यापार घाटे की आशंका से बैंकिंग, आईटी और ऑटो क्षेत्र में भारी बिकवाली हुई।