Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:50 IST

Oneplus-Realme Merger Report: स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. काही रिपोर्ट्सनुसार, लवकरच 'वनप्लस' आणि 'रियलमी' या स्मार्टफोन ब्रँड्सचं विलीनीकरण होऊ शकते.

Oneplus-Realme Merger Report: स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये लवकरच एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो. काही रिपोर्ट्सनुसार, लवकरच 'वनप्लस' आणि 'रियलमी' या स्मार्टफोन ब्रँड्सचं विलीनीकरण होऊ शकते. कंपनी आधीच त्यांच्या जागतिक व्यवसायाबाबत, विशेषतः युरोपमधील भविष्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अशातच या नवीन बातम्या ब्रँडमध्ये काहीतरी मोठा बदल होत असल्याचे संकेत देत आहेत.

वनप्लस आणि रियलमीचं विलीनीकरण

ताज्या रिपोर्ट्सनुसार, वनप्लस आणि रियलमीचे ऑपरेशन्स आता एकत्र आणलं जात आहेत. असं म्हटलं जातंय की, दोन्ही ब्रँड्स एका नवीन 'सब-प्रोडक्ट सेंटर' अंतर्गत काम करतील, ज्यामध्ये चीन आणि जागतिक दोन्ही बाजारपेठांचा समावेश असेल. यासोबतच मार्केटिंग आणि आफ्टर-सेल्स सर्विस सारखे विभाग देखील एकत्रित केले जाऊ शकतात. रिपोर्ट्समध्ये असंही समोर आलंय की, दोन्ही कंपन्यांच्या टीम आता एकाच नेतृत्वाखाली काम करू शकतात आणि प्रोडक्ट लाइन्स सामायिक करण्यावर भर दिला जाईल, या माध्यमातून खर्च कमी व्हावा आणि काम अधिक प्रभावी व्हावं अशी कंपनीची इच्छा आहे.

कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट

वनप्लस हा आधीपासूनच ओप्पोचा (Oppo) सब-ब्रँड आहे आणि रियलमीला देखील अलीकडेच ओप्पोच्या रचनेच्या अधिक जवळ आणले गेलेय. जर या विलीनीकरणाच्या बातम्या खऱ्या ठरल्या, तर हा ओप्पो ग्रुपमधील एक मोठा संरचनात्मक बदल मानला जाईल. याचा उद्देश वेगवेगळ्या ब्रँड्समधील ओव्हरलॅप कमी करणं आणि ऑपरेशन अधिक कार्यक्षम बनवणं हा असू शकतो.

अलीकडच्या आठवड्यात वनप्लसनं हे मान्य केलंय की, ते युरोपमधील त्यांच्या भविष्याचं मूल्यांकन करत आहेत. काही रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलंय की, कंपनी काही बाजारपेठांमधून माघार घेऊ शकते. जरी कंपनीचं म्हणणे आहे की सध्या त्यांचे काम सामान्यपणे सुरू आहे, तरीही सतत येणाऱ्या बातम्यांमुळे अनिश्चितता वाढली आहे.

वनप्लसच्या शिपमेंट आकडेवारीतील घसरण

वनप्लससाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे त्यांची घसरणारी शिपमेंट आकडेवारी. २०२५ मध्ये भारतात कंपनीच्या शिपमेंटमध्ये मोठी घसरण दिसून आली, जी सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. ही घसरण कंपनीची कामगिरी आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे करते.

English
हिंदी सारांश
Web Title : OnePlus and Realme merger? Big shakeup in smartphone world.

Web Summary : OnePlus and Realme may merge operations under a new sub-product center. This aims to streamline operations, reduce overlaps, and cut costs. OnePlus faces declining shipments and uncertainty in Europe, fueling speculation about restructuring.
टॅग्स :वनप्लस मोबाईलओप्पोरियलमीस्मार्टफोन