उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये एका लग्नादरम्यान जेवणाच्या कारणावरून असा काही वाद झाला की, आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर युद्धभूमीत झाले. मांसाहारी जेवणातील मटण संपल्याच्या कारणावरून पाहुण्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पाहुण्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली, ज्यामध्ये अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिसांनी पाहुण्यांविरोधात गुन्हा दाखल केला.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, रामपूरमधील एका लग्नात जेवण सुरू असताना काही पाहुण्यांनी मटण संपल्याच्या कारणावरून वाढपी आणि वधूच्या नातेवाईकांशी वाद घालायला सुरुवात केली. काही क्षणातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या पाहुण्यांनी प्लास्टिकच्या खुर्च्या एकमेकांवर फेकल्या. तर, काही जणांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी आता दोन्ही बाजुच्या पाहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नेमके वादाला सुरुवात कशी आणि कुणी केली, याचा पोलीस तपास करीत आहेत. जेवणावरून सुरू झालेला हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात या लग्नाचीच चर्चा रंगली आहे.
Web Summary : A wedding in Uttar Pradesh turned chaotic after a dispute over meat led to a brawl. Guests exchanged blows and threw chairs, resulting in minor injuries. Police intervened and filed charges against involved parties, investigating the cause of the fight.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक शादी में मटन को लेकर विवाद हो गया। मेहमानों ने मारपीट की और कुर्सियां फेंकी, जिससे कुछ लोग घायल हो गए। पुलिस ने हस्तक्षेप कर मामला दर्ज कर लिया है और जांच कर रही है।