शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलन

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

बुद्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलन

बुद्धनगरीत दोन दिवसीय भिख्खु संमेलन
भदंत आनंद महाथेरोंची माहिती : बोधगया महाविहाराच्या मुक्तीबाबत होणार विचारमंथन
नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हिंदूंच्या ताब्यात असून हा विहार मुक्त करण्याच्या दृष्टीने भूमिका ठरविण्यासाठी लॉर्ड बुद्धा मैत्री संघ आणि वंदना संघ दीक्षाभूमीच्यावतीने दोन दिवसांचे अखिल भारतीय भिख्खु संमेलन २५ आणि २६ जानेवारीला आसोला येथील बुद्धनगरीच्या लॉर्ड बुद्धा परिसरात करण्यात आले आहे, अशी माहिती भदंत आनंद महाथेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भदंत आनंद महाथेरो म्हणाले, बोधगया महाबोधी महाविहार कायद्याने हिंदूंच्या ताब्यात आहे. हे महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी मागील १८ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन दिवसीय भिख्खु संमेलनात घर वापसी अभियान बौद्ध धम्मासह, अल्पसंख्यांक धर्मावर परिणाम करणारे आहे यावर तसेच मोदी सरकारच्या धर्म परिवर्तन विरोधी विधानाचा धर्म स्वातंत्र्यावर होणारा परिणाम, भारतीय बौद्धांची भूमिका यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यासाठी १९४९ च्या कायद्यात बदल करून नवा कायदा तयार करण्यासंदर्भात भूमिका ठरविण्यात येणार आहे. दोन दिवसीय भिख्खु संमेलनाचे उद्घाटन भिख्खु भदंत ज्ञानेश्वर कुशीनारा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भदंत आनंद महाथेरो उपस्थित राहणार आहेत. संमेलनात भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भदंत नरेंदा महाथेरो, भदंत आर्यपुत्र अंगुलीमाल महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, भदंत थेरोज्योती महाथेरो, शांतीस्वरूप बौद्ध, राजेंद्र गाणोरकर, भय्याजी खैरकर, देवीदास घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पत्रकार परिषदेला भदंत आनंद महाथेरो, भदंत प्रज्ञाशील महाथेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, प्रा. देवीदास घोडेस्वार, भय्याजी खैरकर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)