अंधश्रद्धेतून मुलाकडून दोघांची हत्या

By Admin | Updated: October 27, 2015 23:32 IST2015-10-27T23:32:51+5:302015-10-27T23:32:51+5:30

पश्चिम दिल्लीत दोन दिवसांत दोघांची थरारक पद्धतीने हत्या करीत एका १६ वर्षीय मुलाने जगात कीर्तिवंत आणि ऐश्वर्यसंपन्न होण्याचा निवडलेला मार्ग अद्यापही समाजमनावर अंधश्रद्धेचा

Two children murdered by superstition | अंधश्रद्धेतून मुलाकडून दोघांची हत्या

अंधश्रद्धेतून मुलाकडून दोघांची हत्या

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीत दोन दिवसांत दोघांची थरारक पद्धतीने हत्या करीत एका १६ वर्षीय मुलाने जगात कीर्तिवंत आणि ऐश्वर्यसंपन्न होण्याचा निवडलेला मार्ग अद्यापही समाजमनावर अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट आहे हेच दर्शविणारा आहे. शाळा सोडलेल्या या किशोरवयीन मुलाला रविवारी पोलिसांनी अटक केली.
तो निहाल विहार या कमी उत्पन्न गट असलेल्या वस्तीत राहतो. त्याने शक्रवारी दुसरा खून केला होता. या मुलाने मोफत दारूचे आमीष दाखविल्यामुळे २६ वर्षीय प्रदीपने त्याला या कामी मदत केली. किमान दहा जणांचा खून केल्यास जगभरात प्रसिद्धी आणि सर्व प्रकारची संपत्ती पायाशी लोळेल असा दृष्टांत त्याला पवित्र बाबाने स्वप्नात दिला होता.
या मुलाची आई रोजमजुरी करते तर मोठा भाऊ भंगारविक्रीचे काम करतो. त्याने २५ वर्षीय कन्हय्या याची भोसकून हत्या करीत दहा जणांच्या हत्यासत्राचा मार्ग अनुसरला होता, असे संकेत त्याने दोन दिवसांत दोघांना संपविल्यावरून मिळतात. २१ आॅक्टोबर रोजी या मुलासह प्रदीपने कन्हय्याला हातभट्टीची दारू देण्यासाठी निर्जनस्थळी नेत भोसकले होते. ४८ तासांतच त्याने हरिराम (४०) याला शरीरभर भोसकून मारले. हरिरामलाही त्याने दारूचे आमीष दाखविले होते.
कायद्याची नव्याने चर्चा
गंभीर गुन्ह्णांमध्ये लहान मुलांचा वाढता सहभाग पाहता बलात्कार आणि हत्याकांडात सहभागी अशा मुलांवर प्रौढांप्रमाणे कारवाई करण्यासाठी वयोमर्यादा कमी करीत १६ वर आणण्याची मागणी होत असताना राजधानीतील या हत्याकांडाने नव्याने चर्चेला तोंड फोडले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Two children murdered by superstition