बंधार्याच्या उतारावर उसाचा ट्रेलर पलटी
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:22+5:302015-02-14T23:52:22+5:30
तळेगाव ढमढेरे : विठ्ठलवाडी- सांगवी सांडस दरम्यानच्या बंधार्याच्या उतारावर उसाचा ट्रेलर पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. विठ्ठलवाडीहद्दीतून या बंधार्याच्या उतारावरून ऊसवाहतूक एकाच ट्रेलरची होते; परंतु नवीन ड्रायव्हरने डबल ट्रेलर या बंधार्याच्या उतारावरून नेत असताना पुढील ट्रेलर बंधार्याच्या बाजूलाच पलटी झाला. सुदैवाने ट्रॅक्टर व ट्रेलर पाण्याने भरलेल्या बंधार्यात पडला नाही. त्यामुळे मोठा अपघात टळला. या बंधार्यास संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका संभवतो. या बंधार्यावरून जड वाहनांची अनधिकृत वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. संबंधित पाटबंधारे विभागाचे जड वाहतुकीकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. याबाबत सरपंच कांतिलाल गवारे यांनी सांगितले, की हा बंधारा शेतकरीवर्गास पाणीसाठ्यासाठी संबंधित विभागाने बांधलेला आहे. हलकी वाह

बंधार्याच्या उतारावर उसाचा ट्रेलर पलटी
त ेगाव ढमढेरे : विठ्ठलवाडी- सांगवी सांडस दरम्यानच्या बंधार्याच्या उतारावर उसाचा ट्रेलर पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. विठ्ठलवाडीहद्दीतून या बंधार्याच्या उतारावरून ऊसवाहतूक एकाच ट्रेलरची होते; परंतु नवीन ड्रायव्हरने डबल ट्रेलर या बंधार्याच्या उतारावरून नेत असताना पुढील ट्रेलर बंधार्याच्या बाजूलाच पलटी झाला. सुदैवाने ट्रॅक्टर व ट्रेलर पाण्याने भरलेल्या बंधार्यात पडला नाही. त्यामुळे मोठा अपघात टळला. या बंधार्यास संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका संभवतो. या बंधार्यावरून जड वाहनांची अनधिकृत वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. संबंधित पाटबंधारे विभागाचे जड वाहतुकीकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. याबाबत सरपंच कांतिलाल गवारे यांनी सांगितले, की हा बंधारा शेतकरीवर्गास पाणीसाठ्यासाठी संबंधित विभागाने बांधलेला आहे. हलकी वाहने गेल्यास धोका नाही. परंतु जड वाहने सतत जाऊ लागली, तर बंधार्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत या बंधार्यावरून जडवाहनास बंदी घालण्यात यावी, असा ठराव झाल्याचे गवारे यांनी सांगितले. या बंधार्यावर विठ्ठलवाडी, सांगवी सांडस, न्हावी सांडस, भोसेवस्ती, धानोरे, तळेगाव ढमढेरे येथील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामुळे संबंधित विभागाने जड वाहतुकीस निर्बंध घालावेत, अशी मागणी सरपंच गवारे यांनी केली आहे.फोटो ओळ : विठ्ठलवाडी येथील भीमा नदीवरील बंधार्याच्या उतारावर उसाचा पलटी झालेला ट्रेलर.