ट्रक व टेम्पोची धडक ; एक ठार, एक जखमी (मुख्य अंकासाठी)

By Admin | Updated: September 29, 2015 22:30 IST2015-09-29T22:30:47+5:302015-09-29T22:30:47+5:30

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील लोहारे गावाच्या हद्दीत ट्रक आणि टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक होवून टेम्पो चालक ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० सुमारास घडली. राजू श्रीवास्तव (३०, रा. शिळफाटा, मुंब्रा) हा ट्रक रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने येत होता. त्याच दरम्यान विजय सदाशिव एकपाळे (३२, रा. एकवळी भरणेनाका, खेड) हा टेम्पोने महाडकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. ट्रक चालक श्रीवास्तव याने अतिवेगाने व बेदरकारपणे वाहन चालवून वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो चालक विजय एकपाळे ठार झाले असून श्रीवास्तव जखमी झाला आहेे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी श्रीवास्तव यास पोलादपूर ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Trucks and tempo strikes; One killed, one injured (for main issue) | ट्रक व टेम्पोची धडक ; एक ठार, एक जखमी (मुख्य अंकासाठी)

ट्रक व टेम्पोची धडक ; एक ठार, एक जखमी (मुख्य अंकासाठी)

लादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील लोहारे गावाच्या हद्दीत ट्रक आणि टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक होवून टेम्पो चालक ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० सुमारास घडली. राजू श्रीवास्तव (३०, रा. शिळफाटा, मुंब्रा) हा ट्रक रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने येत होता. त्याच दरम्यान विजय सदाशिव एकपाळे (३२, रा. एकवळी भरणेनाका, खेड) हा टेम्पोने महाडकडून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. ट्रक चालक श्रीवास्तव याने अतिवेगाने व बेदरकारपणे वाहन चालवून वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो चालक विजय एकपाळे ठार झाले असून श्रीवास्तव जखमी झाला आहेे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमी श्रीवास्तव यास पोलादपूर ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Trucks and tempo strikes; One killed, one injured (for main issue)