शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची चोरटी वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने चिरडले तरुणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 23:51 IST

जळगाव: वाळूची चोरटी वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने रस्त्यावर असलेल्या गोपाळ संतोष नन्नवरे (वय २२ रा.खेडी खुर्द ता.जळगाव) या तरुणाला चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजता कानळदा-जळगाव रस्त्यावर आव्हाणे फाट्यानजीक असलेल्या हॉटेल लक्ष्मीसमोर घडली. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून फरार झाला आहे. वाळू वाहतुक करणार्‍या वाहनाने घेतलेला आठवड्यातील हा तिसरा बळी आहे.

जळगाव: वाळूची चोरटी वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टरने रस्त्यावर असलेल्या गोपाळ संतोष नन्नवरे (वय २२ रा.खेडी खुर्द ता.जळगाव) या तरुणाला चिरडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजता कानळदा-जळगाव रस्त्यावर आव्हाणे फाट्यानजीक असलेल्या हॉटेल लक्ष्मीसमोर घडली. अपघातानंतर चालक ट्रॅक्टर सोडून फरार झाला आहे. वाळू वाहतुक करणार्‍या वाहनाने घेतलेला आठवड्यातील हा तिसरा बळी आहे.

मित्रांसोबत आला होता हॉटेलवर जेवायला
गोपाळ हा दारु पिवून संध्याकाळी गावात गेला होता. तेथे त्याला त्याचे मित्र भेटले. त्यांना जेवणासाठी हॉटेलमध्ये येण्याची विनंती केली, मात्र आमच्याकडे बील भरायला पैसे नाहीत म्हणून मित्रांनी नकार दिला. तुम्ही चला बील मी भरतो असे सांगून त्याने पांडुरंग आनंदा सोनवणे (वय २७), समाधान भगवान सोनवणे (वय २८), समाधान भागवत रंधे (वय ३१), प्रवीण गोकुळ सपकाळे (वय २५), समाधान कडू सपकाळे (वय ३६), गणेश आधार साळुंखे व समाधान मांगिलाल सोनवणे (वय ३१) सर्व रा.खेडी खुर्द ता.जळगाव यांना सोबत घेवून कानळदा रस्त्यावरील हॉटेल लक्ष्मीमध्ये जेवायला आले.

वाहने अडविणे पडले महागात
हॉटेलवर दारु व जेवण झाल्यानंतर गोपाळ हा रात्री एक वाजता रस्त्यावर आला. चोरटी वाहतुक करणार्‍या वाहनांना अडवून त्यांच्याकडून पैसे गोळा करु असे त्याने त्याच्या मित्रांना सांगितले. यावेळी बर्‍याच जणांनी त्याला विरोध केला. परंतु, तरीही गोपाळ याने रस्त्यावर दुचाकी आडवी लावून वाहने वाळूची अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही वाहने थांबली तर काही थांबली नाहीत. अशातच एम.एच.२३ बी.८१७४ क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर आले. त्याला गोपाळने आडवे होवून थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने न थांबता थेट त्याच्या अंगावरुन ट्रॅक्टर नेले. त्यात त्याला जोरदार फटका बसून शरीरातील आतडे बाहेर आले व तो जागीच गतप्राण झाला. गोपाळला धडक लागल्याचे पाहून चालकाने ट्रॅक्टर भरधाव वेगाने पुढे नेले. यावेळी प्रवीण सपकाळे याने त्याचा पाठलाग केला. ट्रॅक्टरच्या धडकेत गोपाळचा मृत्यू झाल्याचे समजताच चालकाने रस्त्यावर ट्रॅक्टर सोडून केळी बागेतून पळ काढला.