शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand: उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा राजीनामा; राज्यपालांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 23:54 IST

Uttarakhandh CM Tirath Singh Rawat Resigns : तीरथ सिंह रावत यांनी घेतली राज्यपालांची भेट. राज्यपाल बेबी रानी मोर्य यांची भेट घेत दिला राजीनामा.

ठळक मुद्दे तीरथ सिंह रावत यांनी घेतली राज्यपालांची भेट.राज्यपाल बेबी रानी मोर्य यांची भेट घेत दिला राजीनामा.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची संध्याकाळी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर रावत यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदासाठी संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभारही मानले.

"मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. केंद्रीय नेतृत्वानं वेळोवेळी मला संधी दिली. यासाठी मी नेतृत्वाचे आभार व्यक्त करतो," अशी प्रतिक्रिया रावत यांनी राजीनाम्यानंतर दिली. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होणं निश्चित आहे. यासाठी शनिवारी भाजपच्या राज्य विधीमंडळाच्या दलाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नव्या चेहऱ्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी घटनात्मक अडचणींचे कारण देत तीरथ सिंह रावत यांना राजीनामा देण्याची सूचना दिली होती. सध्याच्या आमदारांमधूनच पुढील मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. तीरथ सिंह रावत हे गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. यादरम्यान, त्यांनी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत दोन वेळा चर्चा केली. पौडी येथून लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांनी १० मार्च रोजी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, मुख्यंमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी तीरथ सिंह रावत यांना १० सप्टेंबरपर्यंत विधानसभा सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक होतं.

दोन जागा रिक्तउत्तराखंडमध्ये विधानसभेच्या दोन जागा गंगोत्री आणि हल्द्वानी रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. मात्र राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्याने सदस्यत्वाचा एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाElectionनिवडणूक