शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट कापले, आता वरुण गांधी काय करणार? उमेदवारी अर्ज भरण्याची आज अंतिम मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 06:36 IST

वरूण गांधी आता समाजवादी पार्टी, काँग्रेसकडून किंवा अपक्ष म्हणूनसुद्धा निवडणूक लढू शकतात अशा चर्चा आहेत.

- ललित झांबरेपिलिभीत : सध्या भाजपने तिकीट नाकारल्यामुळे वरुण गांधी यांचे नाव चर्चेत आहे. पिलिभीत मतदारसंघातून भाजपने त्यांच्या जागी यावेळी जितीन प्रसाद यांना संधी दिली आहे. यानंतर वरुण गांधी नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता साऱ्या देशाचे लक्ष आहे. 

पिलिभीत मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहेतिथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारपर्यंतच (दि. २७) मुदत आहे. त्यासाठी आता अखेरच्या दिवशी वरुण गांधी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वरूण गांधी आता समाजवादी पार्टी, काँग्रेसकडून किंवा अपक्ष म्हणूनसुद्धा निवडणूक लढू शकतात अशा चर्चा आहेत. मात्र, स्वत: वरुण गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.  

काॅंग्रेसमध्ये जाणार की समाजवादी पक्षात?वरुण गांधी हे जर काँग्रेसमध्ये गेले तर त्यांना अमेठी किंवा रायबरेली येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते. देशाचे लक्ष लागून असलेल्या या दोन्ही जागांवर काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. ते सपाकडे वळण्याच्या चर्चा असल्या तरी अखिलेश यादव यांनी याबाबत स्पष्ट बोलणे टाळले आहे.

...यामुळे ओढावली नाराजीवरुण गांधी यांनी बऱ्याचदा उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली होती. गेल्या वर्षी अमेठीतील संजय गांधी दवाखान्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या दवाखान्याचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यावेळीही वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. लखमीपूर खेरी येथील हिंसाचाराबद्दल केलेल्या विधानानंतर मनेका गांधी व वरुण गांधी यांना भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळले होते.

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४