शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:58 IST

बोरीवलीमध्ये बेस्ट बसच्या धडकेत एका तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला

Mumbai Accident: मुंबईतून पुन्हा बेस्ट बस अपघाताची हादरवणारी घटना समोर आली आहे. बोरीवलीत बेस्ट बसच्या धडकेत एका तीन वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला. बोरिवलीच्या राजेंद्र नगरमध्ये दुपारी १२.४० च्या सुमारास हा अपघात झाला. मागठाणे आगाराची बेस्टची बस बोरिवली स्थानकातून मागठाणे आगाराच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. रस्ता ओलांडत असताना अचानक चिमुकली बससमोर आली. त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बेस्टच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरकडून देण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, बोरिवलीतील राजेंद्र नगरजवळ ए-३०१ मार्गावर धावणाऱ्या बेस्ट वेटलिज बसचा अपघात झाला. बस राजेंद्र नगर येथे आली असता, मेहक खातून शेख ही तीन वर्षीय मुलगी रस्ता ओलांडत असताना अचानक बससमोर आली. बसला धडक दिल्यानंतर मुलीचे डोके टायरखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर लगेचच पोलिसांनी मुलीला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मुलीला एक वाजता मृत घोषित केले.

अपघातग्रस्त बसमध्ये चालकाशिवाय कोणी नव्हते. बस चालक प्रकाश दिगंबर कांबळे (४८) ही बस चालवत होते. मुलगी अचानक रस्त्यावर आली. त्यावेळी चालकाने बस थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती बसच्या चालाखाली आली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, अशी माहिती बेस्टकडून देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून करत चौकशी सुरू केली. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी कुर्ला येथे झालेल्या अपघाता नऊ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

कांदिवलीमध्ये दोन महिलांना टेम्पोची धडक

दुसरीकडे, कांदिवलीमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दोन वृद्ध महिलांना शनिवारी भरधाव वेगात धावणाऱ्या टेम्पोने धडक दिली होती. या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसरी महिला गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घरातून काही वस्तू खरेदी करण्यासाठी निघालेल्या महिला रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी  भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने महिलांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पोचालकाला अटक केली. 

टॅग्स :MumbaiमुंबईBESTबेस्टAccidentअपघात