Three terrorists with ammunition were held at the Kashmir-Punjab border and have been arrested by the forces | जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-47 जप्त
जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-47 जप्त

कठुआ: जम्मू-काश्मीर पोलिसांना तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांना पोलिसांनी पंजाब आणि जम्मू-काश्मीरजवळील लखनपूरहून अटक केली आहे.

एका ट्रकमधून शस्त्रे घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ट्रकवर कारवाई करत तीन दहशतवाद्यांना अटक केली. तसेच, या दहशतवाद्यांकडून सहा एके-47 सुद्धा जप्त करण्यात आली आहे. शस्त्रास्त्रे घेऊन जाणारा ट्रक जप्त करण्यात आल्याचे कठुआच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.  

दरम्यान, सुरक्षा दलाचे दोन दिवसातील हे मोठे यश आहे. काल जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. आसिफ असे खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबाचा टॉप रँकचा दहशतवादी असल्याची माहिती मिळते. या परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 


Web Title: Three terrorists with ammunition were held at the Kashmir-Punjab border and have been arrested by the forces
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.