शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर जाणाऱ्या १०० जणांत तीन भारतीय

By admin | Updated: February 17, 2015 02:36 IST

मंगळावर वसाहत करण्यासाठी उपांत्य फेरीत १०० लोकांची निवड करण्यात आली असून या साहसी नागरिकांत ३ जण भारतीय आहेत.

२०२४ ची योजना : पहिल्या टप्प्यात चारजण जाणार ग्रहावर; वसाहतीसाठी २०२,५८६ लोकांनी केला अर्जलंडन : मंगळावर वसाहत करण्यासाठी उपांत्य फेरीत १०० लोकांची निवड करण्यात आली असून या साहसी नागरिकांत ३ जण भारतीय आहेत. त्यात दोन महिला असून एक पुरुष आहे. २०२४ मध्ये यातील पहिले चारजण मंगळावर जातील. मंगळावर जाणारी ही खाजगी सहल असून, त्याअंतर्गत एकदाच मंगळावर जाण्याची सोय आहे. मंगळावर वसाहतीसाठी जाण्यास इच्छुक असणाऱ्या २०२,५८६ लोकांनी अर्ज केले होते. त्यातील १०० जणांची निवड करण्यात आली असून, निवड झालेल्या लोकांना सध्या अंतराळात जाण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नेदरलँडमधील विनानफा तत्वावर काम करणारी संघटना मार्स वन तर्फे ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मंगळावर मानवी वसाहत वसविण्यात येणार असून, त्यासाठी ४० लोकांना मंगळावर कायमचे राहण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. अंतिम निवड झालेल्या लोकांना सात वर्षे प्रशिक्षण दिले जाणार असून, २०२४ पासून दर वेळी चारजण याप्रमाणे लोक पाठविले जातील. मार्स १०० राऊंडमध्ये भारताचे तीन सदस्य आहेत. या १०० सदस्यात ३९ अमेरिकन असून, ३१ युरोपमधील आहेत. १६ अशियन असून, ७ आफ्रिकेतील आहेत तर ७ ओशियानातील आहेत. गेल्यावर्षी जाहीर झालेल्या दुसऱ्या फेरीत ४४ भारतीय होते. या निवडीत निवड झालेल्या ६६० जणांतून १०० लोकांची निवड यावर्षीच्या तिसऱ्या फेरीत करण्यात आलेली आहे. मार्स वन संघटनेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नोबर्ट क्राफ्ट यांनी या लोकांची आॅनलाईन मुलाखत घेतली होती. धोक्याला तोंड देण्याची क्षमता, या सहलीत असणाऱ्या धोक्यांची जाणीव, जीवन बदलवणाऱ्या या मोहीमेत सहभागी होण्यासाठी मिळणारी प्रेरणा . या मुलाखतीत सहभागी होणारे सदस्य किती कणखर मनोवृत्तीचे आहेत हे यातून समजले , ही प्रक्रिया अत्यंत कठीण होती असे क्राफ्ट यांनी सांगितले. पुढच्या निवड फेरीत सर्व कष्ट सहन करु शकणारे गट तयार केले जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मार्स आऊटपोस्टची प्रत व अंतिम प्रशिक्षण पृथ्वीवर मिळणार आहे. (वृत्तसंस्था)मंगळावर कायमचे जाण्याची तयारी असणाऱ्या भारतीय नागरिकांत तरणजित सिंग भाटिया (२९)- सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्सची डॉक्टरेट करीत आहेत. दोन भारतीय महिलांपैकी रितिका सिंग (२९) या दुबईत राहत असून श्रद्धा प्रसाद (१९) ही केरळमधील युवती आहे.