शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या संसदेत तीन भारतीय वंशाचे सदस्य

By admin | Updated: November 9, 2016 20:11 IST

अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे.

ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. 9 - अमेरिकेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाच्या तीन सदस्यांनी बाजी मारली आहे. वॉशिंग्टनमधून प्रमिला जयपाल प्रतिनिधी सभेवर निवडून आल्या आहेत. तर कमला हॅरिस कॅलिफोर्नियामधून सिनेटर म्हणून निवडून आल्या आहेत  त्याबरोबरच राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले आहेत. 
 भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी अमेरिकन सिनेटर म्हणून  निवडून येत इतिहास रचला आहे. सिनेटर म्हणून निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक ठरल्या आहेत. कमला हॅरिस यांनी  कॅलिफोर्नियाच्या अॅटॉर्नी जनरल म्हणून काम पाहिले आहे. त्यांची आई भारतीय असून, वडील जमैकातील आहेत. 51 वर्षांच्या हॅरिस यांनी  निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या लोरेटा सँचेझ यांना 34.8 टक्क्यांच्या मताधिक्याने मात दिली.  
त्याबरोबरच प्रमिला जयपाल यांनी वॉशिंग्टनमधून विजय मिळवला आहे. त्या प्रतिनिधी सभेमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला ठरल्या आहेत.तर राजा कृष्णमूर्थी हेसुद्धा  अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये निवडून आले भारतीय वंशाचे पहिले नागरिक ठरले आहेत. त्याबरोबरच लतिका मेरी थॉमस, रोहित खन्ना, रोहित खन्ना आणि एमी बेरी या भारतीय वंशाच्या उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय अद्याप झाला नव्हता.