शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरला हजार कोटी

By admin | Updated: September 8, 2014 03:26 IST

मुसळधार पाऊस आणि विक्राळ पुरामुळे जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती कमालीची गंभीर झाली आहे. या स्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले

श्रीनगर/ जम्मू : मुसळधार पाऊस आणि विक्राळ पुरामुळे जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती कमालीची गंभीर झाली आहे. या स्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जाहीर केले. तसेच एक हजार कोटी रुपयांच्या विशेष मदतीची घोषणा केली. राज्यातील पुराने आणखी रौद्ररूप धारण केले असून, बळींची संख्या १५० वर पोहोचली आहे़ जम्मू-काश्मीर या अपूर्व संकटाला सामोरे जात असतानाच तशीच परिस्थिती ओढवलेल्या पाकव्याप्त काश्मीरलाही भारताने मदतीचा हात देऊकेला आहे. श्रीनगरमधील स्थिती इतकी भीषण आहे की लष्करी छावणी, नागरी सचिवालय, उच्च न्यायालय हा सारा परिसर जलमय झाला आहे़ जम्मूतही स्थिती गंभीर आहे़ रविवारी पंतप्रधानांनी या पूरस्थितीची हवाई पाहणी केली़ यानंतर श्रीनगरला पोहोचताच त्यांनी राष्ट्रीय आपत्ती आणि मदतीची घोषणा केली. पंतप्रधानांनी अन्य राज्यांनाही जम्मू-काश्मीरच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले़ आपले सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले़ पाकव्याप्त काश्मिरातील पूरपीडितांच्या मदतीसाठीही भारत तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले़ जम्मू-काश्मीरप्रमाणेच पाकव्याप्त काश्मिरातही पुराने भीषण हानी झाली आहे़ पाकिस्तानची तयारी असेल तर भारत पाकव्याप्त काश्मिरात मानवीय दृष्टीने मदत देण्यास तयार आहे, असे मोदी म्हणाले़