शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' पोलिसाचं शोभा डेंना भन्नाट उत्तर

By admin | Updated: February 22, 2017 23:27 IST

लेखिका शोभा डे यांनी मंगळवारी मतदान केल्यानंतर पोट सुटलेल्या एका लट्ठ पोलिसाचा फोटो ट्विट करून मुंबई पोलिसाची खिल्ली उडवली होती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - लेखिका शोभा डे यांनी मंगळवारी मतदान केल्यानंतर  पोट सुटलेल्या एका लट्ठ पोलिसाचा फोटो ट्विट करून मुंबई पोलिसाची खिल्ली उडवली होती. ट्विट केलेला फोटो हा मुंबई पोलिसाचा नाही असं उत्तरही मुंबई पोलिसांनी शोभा डेंना दिलं होतं. 
 
दौलतराम जोगावत असं त्या पोलिसाचं नाव असून ते मध्य प्रदेश पोलिसात पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार जोगावत यांनी डेंना उत्तर देत माझं वजन मी जास्त खातो म्हणून वाढलेलं नाही तर इन्स्युलिनच्या असमतोलामुळे आहे असं म्हटलं आहे. डे यांच्या ट्विटमुळे दुखावलेले जोगावत म्हणाले, शोभा डे यांची  इच्छा असेल तर त्या माझ्यावरील उपचाराचा खर्च उचलू शकतात, बारीक व्हायला कोणाला नाही आवडत?   
 
यापुर्वी शोभा डे यांच्या मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणा-या ट्विटला मुंबई पोलिसांनी जशास तसे उत्तर दिलं होतं.  मंगळवारी मतदान केल्यानंतर शोभा डे यांनी पोट सुटलेल्या एका जाडजुड पोलिसाचा फोटो ट्विट केला होता. त्यावर 'Heavy Police Bandobast In mumbai today', असे पोलिसांची खिल्ली उडवणारे कॅप्शनही टाकले. यानंतर सोशल मीडियावर हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाला. या ट्विटची माहिती पोलिसांना समजली. काहीही संबंध नसलेला फोटो ट्विट करुन शोभा डे मुंबई पोलिसांची बदनामी करत असल्याने त्यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन प्रत्युत्तर देऊन शोभा डेंची बोलतीच बंद केली. 
 
 'मस्करी करायला आम्हालाही आवडते. गणवेशासहीत फोटोतील पोलीस कर्मचारी आमचा नाही. तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकांकडून आम्हाला चांगल्या गोष्टी अपेक्षित आहे', असा टोला मुंबई पोलिसांनी शोभा डे यांना हाणला.