‘त्या’ खासदारांकडे आढळला मद्यसाठा

By Admin | Updated: July 29, 2014 02:56 IST2014-07-29T02:56:10+5:302014-07-29T02:56:10+5:30

१७ जुलै रोजी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी बळजबरीने चपाती खाऊ घालून आपला रोजा तोडल्याचा आरोप महाराष्ट्र सदनातील एका मुस्लीम कर्मचाऱ्याने केला होता

'Those' MPs found in the cupboard | ‘त्या’ खासदारांकडे आढळला मद्यसाठा

‘त्या’ खासदारांकडे आढळला मद्यसाठा

रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
चपाती प्रकरणावरून येथील महाराष्ट्र सदन आधीच तापलेले असताना या सदनात रहिवासासाठी आलेल्या खासदारांनी आपल्यासोबत आणलेला मद्यसाठा स्कॅनरमध्ये चित्रबद्ध झाल्याची बाब समोर आल्याने सदनातील वादाला आता वेगळीच धार लागली आहे!
१७ जुलै रोजी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी बळजबरीने चपाती खाऊ घालून आपला रोजा तोडल्याचा आरोप महाराष्ट्र सदनातील एका मुस्लीम कर्मचाऱ्याने केला होता. या प्रकरणाची चौकशी मुख्य सचिव ज.स. सहारिया हे करीत आहेत. त्याविषयी ते माहिती गोळा करीत असताना खासदारांच्या मद्यसाठ्याविषयीची चित्रफीत त्यांच्या हाती आली.
सदनाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला गोदरेज बॅगेज स्कॅनर आहे. त्यातून सदनात नेल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्याची तपासणी केली जाते. या स्कॅनरच्या रुळावर बॅग ठेवल्याबरोबर त्यात मद्य असेल तर लाल रंगाचा ड्रॉप तिथे येतो. जर एखाद्याने बाहेरील वस्तूंची आॅर्डर केली असेल, तर त्या आत आणताना संबंधित व्यक्तीचे नाव, कोणासाठी हा साठा दिला जात आहे व कक्ष क्रमांक असे बारीकसारीक तपशील नोंदविले जातात.

Web Title: 'Those' MPs found in the cupboard