शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी चक्क ट्रांसफॉर्मर पळवला; संपूर्ण गाव 25 दिवसांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 21:11 IST

ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील सोर्हा गावात मागील 25 दिवसांपासून वीज आलेली नाही. याचे कारण म्हणजे, चोरट्यांनी चक्क गावातील 250 KVA चा ट्रांसफॉर्मर चोरुन नेला. ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्याने 14 डिसेंबरपासून गावकरी वीजेविना जगत आहेत. 

5 हजार लोक अंधारातचोरीची माहिती मिळताच पोलीस व विद्युत विभागाने तपास सुरू केला, मात्र 25 दिवस उलटले, तरी गावात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला नाही. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेले हे गाव 25 दिवसांपासून अंधारात बुडाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत असून, आता वीज नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विद्यार्थी अभ्यास करू शकत नाहीतवीज नसल्याचा सर्वाधिक फटका फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या उत्तर प्रदेश बोर्डाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. विजेशिवाय विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करता येत नसल्याने त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गावप्रमुख सतपाल सिंह म्हणाले, वीज नसल्यामुळे मुलांचे शिक्षण आणि गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. इन्व्हर्टर आणि मोबाइल चार्जिंगसारख्या मूलभूत गरजाही उपलब्ध नाहीत. ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे. उघैती वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता अशोक कुमार म्हणाले, ट्रान्सफॉर्मर चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येईल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी