शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 15:27 IST

जास्त भीक मिळण्यासाठी हा नवा फंडा सुरु झाला आहे. काही तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यारस्त्यांवर या महिला कारचालक असेल किंवा दुचाकीचालक त्यांना आपले रडगाणे सांगून भीक मागत होत्या.

उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. जीन्स आणि टॉप, पायात शूज अशा हायफाय पेहरावात अनेक महिला भीक मागताना दिसत आहेत. कोणाला विश्वासच बसत नव्हता, परंतू त्यांचे रडगाणे ऐकून लोक त्यांना चक्क १००-२०० रुपये भीक म्हणून देत होते. एवढ्या चांगल्या घरच्या दिसणाऱ्या महिला भीक मागताना पाहून काहींना संशय आला म्हणून त्यांनी थेट पोलिसांनाच सांगत काही महिलांना ताब्यात घेण्यास लावले आहे. 

जास्त भीक मिळण्यासाठी हा नवा फंडा सुरु झाला आहे. काही तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यारस्त्यांवर या महिला कारचालक असेल किंवा दुचाकीचालक त्यांना आपले रडगाणे सांगून भीक मागत होत्या. आपण खूप त्रस्त आहोत, घरची हालत खराब आहे, थोडी आर्थिक मदत हवी आहे, असे सांगत त्या वाहनचालकांकडून पैसे उकळत होत्या. 

रायबरेलीच्या आंवला-बदायू रोडवरील मेडिकल कॉलेजजवळ त्यांनी हे कृत्य करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला लोकांना त्यांच्या पेहरावाकडे पाहून विश्वास बसू लागला होता. अनेकांनी त्यांच्या भुलथापांना बळी पडून १००-२०० रुपये दिले होते. रस्त्यावरचा भिकारी असेल तर त्याला सहसा दोन-पाच, दहा रुपये दिले जातात. परंतू, या महिला चांगल्या पोशाखात असल्याने त्या चांगल्या घरच्या वाटत होत्या. त्यांना खरोखरच गरज असेल म्हणून विचार करून लोक पैसे देत होते. हेच हेरून या महिला अहमदाबादहून रायबरेलीमध्ये भीक मागण्यासाठी आल्या होत्या. 

धक्कादायक बाब म्हणजे या महिलांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी गुजरातच्या अहमदाबादच्या असल्याचे सांगितले परंतू त्या बरेलीला कशा पोहोचल्या याचे उत्तर मात्र देऊ शकल्या नाहीत. पोलिसांनी या महिलांविरोधात शांततेत बाधा आणल्याचा गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले. त्यांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे. 

टॅग्स :BeggerभिकारीahmedabadअहमदाबादUttar Pradeshउत्तर प्रदेश