शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरातील इच्छुकात चढाओढ

By admin | Updated: September 22, 2014 09:47 IST

पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून शहर सेनेने मिडटाऊनमध्ये बैठक घेऊन चाचपणी सुरू केली आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगरपक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून शहर सेनेने मिडटाऊनमध्ये बैठक घेऊन चाचपणी सुरू केली आहे. पालिकेतील मित्रपक्ष साई पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने कुमार आयलानींची कोंडी झाली आहे.उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून पप्पू कालानी यांना हद्दपार करण्यासाठी शिवसेना-भाजपा, साई पक्षासह रिपाइंचे गट-तट गेल्या निवडणुकीत एकत्र आले होते. कलानीविरुद्ध इतर सर्व पक्ष असे चित्र गेल्या निवडणुकीत होते. पप्पू कलानी जन्मठेपेच्या शिक्षाप्रकरणी जेलची हवा खात असून कलानी कुटुंबाकडून ओमी कलानी यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून ओमी कलानी यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू जग्यासी, मोहन खंडारे तर भाजपाकडून विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्यासह शहराध्यक्ष जमनू पुरस्वानी इच्छुक उमेदवार आहेत. सेनेतर्फे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी महापौर व स्थायी समितीच्या सभापती राजश्री चौधरी, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्रसिंग भुल्लर इच्छुक आहेत. रिपाइंचे शहराध्यक्ष नाना बागुल व साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही निवडणूक लढवण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. महापालिकेचे माजी सचिव प्रकाश कुकरेजा यांनी निवडणुकीच्या आराखड्यात उडी घेत सोच बदलो शहर बदलो... असा नारा दिला आहे. मनसेच्या वतीने शहराध्यक्ष संजय घुगे व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख इच्छुक उमेदवार आहेत. साई पक्षाचे जीवन इदनानी व प्रकाश कुकरेजा यांनी भाजपाकडे तिकिटाची मागणी केली आहे. महायुती फिसकटली तर निवडणूक लढवण्याचा पवित्रा शहर सेनाप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घेतला आहे.