शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच प्रकरणांत गोपनीयता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 04:48 IST

विदेशात दडवून ठेवलेल्या पैशाची माहिती संबंधित देशांकडून मागविताना यासंबंधीची माहिती संबंधित व्यक्तीला न देण्याच्या कायदेशीर तरतुदीचा वापर केवळ विशेष प्रकरणांतच केला जाईल,

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांनी विदेशात दडवून ठेवलेल्या पैशाची माहिती संबंधित देशांकडून मागविताना यासंबंधीची माहिती संबंधित व्यक्तीला न देण्याच्या कायदेशीर तरतुदीचा वापर केवळ विशेष प्रकरणांतच केला जाईल, असा निर्णय भारतीय आयकर विभागाची सर्वोच्च संस्था सीबीडीटीने घेतला आहे. याचाच अर्थ गोपनीयतेशी संबंधित कायद्याचा आधार सरसकट घेतला जाणार नाही. माहिती मिळविताना येणारे अडथळे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) आपल्या ताज्या आदेशात म्हटले आहे की, रिफ्रेनमेंट फ्रॉम प्रायर नोटिफिकेशन’ या तरतुदीचा एक तोटाही आहे. जी माहिती करदात्याकडे आधीपासूनच आहे, ती या कलमामुळे प्राप्त करता येत नाही. तसेच विदेशी कर प्राधिकरण अशी माहिती उपलब्ध करून देऊ शकत नाही. या कलमाचा वापर करण्यात आल्यानंतर ज्या-ज्या वेळी प्रत्यक्ष करदात्यांकडून काही माहिती मागविण्याची गरज निर्माण झाली, तेव्हा विदेशी प्राधिकरण अशी माहिती उपलब्ध करून देण्यास अक्षम असल्याचे कळवीत होते. त्यामुळे नव्या अडचणी निर्माण होत होत्या. हे टाळण्यासाठी आता केवळ विशेष प्रकरणांतच संबंधित व्यक्तीला माहिती न देण्याचा अधिकार वापरला जाईल. नियमितपणे सर्वच प्रकरणांत हा अधिकार वापरला जाणार नाही. >करारात काय आहे?भारताने अन्य देशांशी केलेल्या माहिती आदान-प्रदान करारात ‘रिफ्रेनमेंट फ्रॉम प्रायर नोटिफिकेशन’ या उपकलमाची तरतूद असते. या कलमाचा वापर करावयाचा असल्यास तशी सूचना संबंधित देशाला द्यावी लागते. या कलमाचा वापर केल्यास ज्या व्यक्तीबाबत माहिती मिळविली जाते, त्याला माहितीच्या आदान-प्रदानाबाबत काहीही कळू दिले जात नाही.