शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पत्नीच्या नावे मालमत्ता केल्यास प्राप्तिकर लाभ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 5:20 AM

फ्लॅट अथवा कुठलीही स्थावर मालमत्ता विकल्यानंतर तो पैसा दोन वर्षांत दुसऱ्या मालमत्तेमध्ये गुंतविल्यास प्राप्तिकरात सवलत मिळते. पण ही दुसरी मालमत्ता केवळ पत्नीच्या नावे केल्यास प्राप्तिकराच्या या सवलतीचा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश प्राप्तिकर लवादाने एका प्रकरणात दिला आहे.

मुंबई : फ्लॅट अथवा कुठलीही स्थावर मालमत्ता विकल्यानंतर तो पैसा दोन वर्षांत दुसऱ्या मालमत्तेमध्ये गुंतविल्यास प्राप्तिकरात सवलत मिळते. पण ही दुसरी मालमत्ता केवळ पत्नीच्या नावे केल्यास प्राप्तिकराच्या या सवलतीचा लाभ मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण आदेश प्राप्तिकर लवादाने एका प्रकरणात दिला आहे.प्राप्तिकर कायद्याच्या दीर्घकालीन भांडवली नफ्याशी (एलटीसीजी) संबंधित कलम ५४ नुसार, मालमत्तेच्या विक्रीत नफा झाल्यास व तो नफा दोन वर्षे अन्य मालमत्तांमध्ये न गुंतवल्यास तो एलटीसीजी म्हणून ग्राह्य धरला जातो. त्यावर २० टक्के कर लागतो. पण हा नफा अन्य मालमत्ता खरेदीसाठी खर्च केल्यास करातून सवलत मिळते.मुंबईतील रहिवासी असलेले आर. गवाणकर यांनी स्वत: व पत्नीच्या नावे संयुक्त असलेले घर विकले. त्यातून त्यांना नफा झाला. प्राप्तिकर सवलतींतर्गत या नफ्याची रक्कम अन्यत्र गुंतविण्यासाठी गवाणकर यांनी पत्नी व प्रौढ मुलीच्या नावे फ्लॅट खरेदी केला. पण प्राप्तिकर विभागाने त्यांना २० टक्के कर भरणाची नोटीस बजावली. गवाणकर यांनी विभागाकडे अपील केल्यानंतर हे प्रकरण लवादात गेले. लवादाने त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय देत, जुन्या मालमत्ता विक्रीतून नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करायची असल्यास तो फ्लॅट किंवा ती मालमत्ता करदात्याच्या नावेच असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्यावर कर भरावा लागेल, असे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स