शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचे नाव प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध नाही,मीडिया ट्रायल म्हणता येणार नाही : सिक्कीम हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:04 IST

Sikkim High Court News: गुन्हेगारी प्रकरणांच्या बातमीत आरोपीचे नाव प्रसिद्ध करण्यास कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही, असे सिक्कीम हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. रबदेन शेर्पा यांनी दाखल केलेल्या याचिकेत स्थानिक वृत्तपत्राने त्यांच्यावर दाखल झालेल्या एफआयआरच्या बातमीत त्यांचे नाव छापले यावर आक्षेप घेतला होता.

- डॉ. खुशालचंद बाहेतीगंगटोक -  गुन्हेगारी प्रकरणांच्या बातमीत आरोपीचे नाव प्रसिद्ध करण्यास कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही, असे सिक्कीम हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.रबदेन शेर्पा यांनी दाखल केलेल्या याचिकेत स्थानिक वृत्तपत्राने त्यांच्यावर दाखल झालेल्या एफआयआरच्या बातमीत त्यांचे नाव छापले यावर आक्षेप घेतला होता. त्यांनी तपासाची माहिती मीडियाला देण्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली. तसेच गुन्ह्याच्या प्रकरणाचा तपास व खटला पूर्ण होईपर्यंत वृत्तांकन रोखण्याचे निर्देश देण्याची विनंती हायकोर्टात केली होती. नाव व तपशील जाहीर केल्याने त्यांच्या गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होते आणि निष्पक्ष खटल्यावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे होते. 

जोपर्यंत माध्यमे निष्पक्ष, अचूक आणि जबाबदारीने वृत्तांकन करतात व आरोपीला दोषी ठरवत नाहीत किंवा पीडितेची ओळख उघड करत नाहीत, तोपर्यंत असे वृत्तांकन कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. माध्यमांविरुद्ध अनावश्यक कारवाई मागणाऱ्या याचिका न्यायालयांनी सहज स्वीकारू नयेत.- न्या. भास्कर राज प्रधान

माहिती जाहीर न करण्याचा कायदाच अस्तित्वात नाही राज्य सरकारने सांगितले की, संबंधित वृत्त हे केवळ एफआयआरमधील माहितीवर आधारित होते. त्यात कोणतीही पूर्वग्रहदूषित टिप्पणी नव्हती. हायकोर्टाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले की, आरोपीचे नाव किंवा एफआयआरमधील माहिती जाहीर करण्यास मनाई करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : No bar on revealing accused's name, not media trial: Sikkim HC

Web Summary : Sikkim High Court clarified there's no legal restriction on publishing accused's name in crime reports. Court dismissed petition seeking to restrain media from reporting FIR details, stating no law prohibits revealing name or FIR information, provided reporting is fair and accurate.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारी