कोलकाता - भाजपाच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालमधून आमदार बनलेल्या माजी क्रिकेटर अशोक दिंडा यांच्या यशामागे लेडी लक हादेखील मोठा फॅक्टर आहे. २००९ ते २०१३ या काळात भारतीय टीमसाठी २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या अशोक दिंडा यांची पत्नीही स्पोर्टस लव्हर आहे. आता ती राजकारणात पतीच्या पाठीशी ठामपणे काम करते. अशोक दिंडा यांच्या यशामागे त्यांची पत्नी श्रेयसी रुद्र यांचाही हात आहे. मात्र या दोघांच्या प्रेमाची कहाणीही हटके आहे.
अशोक दिंडाच्या पत्नीचे नाव श्रेयसी रुद्र आहे. २०१३ साली अशोक दिंडा यांच्यासोबत लग्नानंतर भलेही श्रेयसी होम मेकर बनल्या असल्या तरी त्या आधी सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या. श्रेयसी यांना क्रिकेटचा नाद होता. बऱ्याचदा आयपीएल सामन्यात अशोक दिंडा क्रिकेट खेळताना श्रेयसी कायम स्टेडियममध्ये पोहचून चिअर करायच्या. श्रेयसीच नव्हे तर तिची आजीही क्रिकेटची चाहती आहे. अशोक दिंडा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत पत्नीच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते.
एका पार्टीत दोघे भेटले होते, तिथून दोघांमध्ये बोलणं सुरू झाले. एकमेकांना ते भेटू लागले. दोघांना एकमेकांचा सहवास आवडू लागला. परंतु नंबर घेण्याची दोघांची हिंमत होत नव्हती. एका मित्राकडून अशोक दिंडा यांनी श्रेयसीचा नंबर घेतला. त्यानंतर मोबाईलवर संवाद होऊ लागला. या दोघांची प्रेम कहाणी ४ वर्ष चालली. त्यानंतर २२ जुलै २०१३ साली या जोडप्यांनी लग्न केले. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असताना अडीच वर्षांनी श्रेयसीला अशोक दिंडा यांनी त्यांच्या आईला भेटवले. अशोक दिंडा यांनी संकोचाने आईला आपल्या भावनांबद्दल सांगितले, कारण आई या लग्नाला होकार देणार नाही असं त्यांना वाटत होते आणि तसेच काहीसे घडलेही, पण शेवटी प्रेमाचा विजय झाला आणि त्यांची आई तयार झाली.
५ टीमसोबत खेळलेत IPL
दरम्यान, अशोक दिंडा कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स, राइजिंग पुणे सुपरजायंट्ससोबत रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू या टीमसोबत आयपीएल खेळले आहेत. २५ मार्च १९८४ रोजी जन्मलेल्या अशोक दिंडा यांनी ७८ आयपीएल सामन्यांमध्ये ६९ बळी घेतले आहेत. भारतीय संघासाठी त्यांनी १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२ बळी आणि नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १७ बळी घेतले आहेत. ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांनी माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यांची त्यांच्या सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती केली, त्याचप्रमाणे भाजपा सरकारमध्ये अशोक दिंडा यांच्याकडेही क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.
Web Summary : Former cricketer and BJP MLA Ashok Dinda's love story began at a party. He got his wife, Shreyasi's, number from a friend. After dating for four years and initial family resistance, they married. Dinda played IPL for five teams.
Web Summary : पूर्व क्रिकेटर और भाजपा विधायक अशोक दिंडा की प्रेम कहानी एक पार्टी में शुरू हुई। उन्होंने अपनी पत्नी, श्रेयसी, का नंबर एक दोस्त से प्राप्त किया। चार साल की डेटिंग और प्रारंभिक पारिवारिक विरोध के बाद, उन्होंने शादी कर ली। दिंडा ने पांच टीमों के लिए आईपीएल खेला।