शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 08:15 IST

या व्हर्च्युअल बैठकीत २४ पक्षांनी भाग घेतला होता. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी दिल्ली : संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी व्हर्च्युअल बैठक घेत सरकारला घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजप सरकारला संसदेमध्ये आठ वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून जाब मागितला जाणार आहे. 

तिवारी म्हणाले की, या व्हर्च्युअल बैठकीत २४ पक्षांनी भाग घेतला होता. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. इंडिया आघाडीचे नेते लवकरच एकमेकांना प्रत्यक्ष भेटणार आहेत. यात सरकारच्या धोरणाविरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याच्या मुद्द्यावर चर्चा होईल. ऑनलाइन बैठकीत विविध अनेक नेत्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले, परंतु प्रामुख्याने आठ मुद्द्यांवर सर्वांचे एकमत झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना-उबाठाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, राजद नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, ‘आप’ने बैठकीपासून दूर राहिली. संसद व्यवस्थित चालावी, असे इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना वाटते, परंतु यासाठी सरकारला विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उपस्थित राहून स्वतः या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. देशात लोकशाही आणि संवैधानिक अधिकार धोक्यात आहेत आणि अशा परिस्थितीत विरोधी पक्षांची भूमिका व जबाबदारी आणखी महत्त्वाची बनते, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. 

परराष्ट्र धोरणाबद्दल विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता सरकारच्या परराष्ट्र धोरणाबद्दल विरोधी पक्षांनी विशेष चिंता व्यक्त केली. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे दावे, बिहारमधील एसआयआर सराव, मतदानाच्या अधिकारांवरील संकट, सीमांकन, एससी, एसटी आणि महिलांवरील अत्याचार, अहमदाबादमधील विमान अपघात, ‘अघोषित आणीबाणी’, सरकारचे परराष्ट्र धोरण आदी मुद्द्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी आधीच पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थी भाष्य आणि चीन मुद्द्यांवर किमान दोन दिवस चर्चेची मागणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Indiaभारतcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस