शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षापासून एकांतात, ना फोन, ना सोशल मीडिया; राधा अन् जियाच्या आयुष्याचा शेवट असा का झाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:21 IST

या दोघी बहि‍णी सोशल मिडिया, लग्न समारंभ आणि इतर सामाजिक सोहळ्यापासून दूर राहत होत्या. मागील ६ वर्षापासून त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या.

लखनौ - पारा परिसरात सख्ख्या बहि‍णींनी पाळीव श्वानाच्या आजारपणातून मानसिक तणाव आल्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. २४ वर्षीय राधा आणि २२ वर्षीय जिया असं या मुलींचे नाव आहे. दोघीही पदवीधर होत्या. दीर्घ काळापासून या दोघीही तणावाखाली होत्या आणि इतरांपासून दूर राहायचा. कुटुंबातही मिसळत नव्हत्या. परिसरातील कुणाशीही संवाद साधत नव्हत्या असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

६५ वर्षीय कैलाश सिंह यांच्या २ मुलींनी जर्मन शेफर्ड प्रजातीचा पाळीव श्वान पाळला होता. ज्याचे नाव टोनी होते. टोनी मागील एक महिन्यापासून गंभीर आजारी होता. उपचारानंतरही त्याच्यात सुधारणा होत नव्हती. श्वान वाचणार नाही याची भीती बहि‍णींना होती. त्यातूनच त्या तणावात होत्या. छोटी बहीण जिया सिंहची मानसिक स्थिती आधीपासून ठीक नव्हती. श्वानाच्या आजारपणामुळे जियासोबत राधाही मानसिक तणावत आली. त्यातूनच या दोघींनी फिनाईल प्यायले. आई वडिलांना ही बाब कळताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघींना राणी लक्ष्मी बाई हॉस्पिटलला दाखल केले, मात्र वाटेतच राधाचा मृत्यू झाला तर जियाने उपचारावेळी प्राण सोडले.

या दोघी बहि‍णी सोशल मिडिया, लग्न समारंभ आणि इतर सामाजिक सोहळ्यापासून दूर राहत होत्या. मागील ६ वर्षापासून त्या घराबाहेर पडल्या नव्हत्या. मोबाईल आणि सोशल मिडिया यातही त्या रमल्या नाहीत. बहुतांश वेळ त्या दोघी त्यांच्या पाळीव श्वानासोबत राहायच्या. या दोघी कधी फोटोही काढत नव्हत्या. फोटो काढा म्हटल्यावर त्यांना राग यायचा. दोघीही एकमेकांशिवाय राहत नव्हत्या. त्या कुटुंबात राहूनही वेगळ्या होत्या. त्यांच्या जेवणात श्वानाचाही वाटा ठेवायच्या. अन्य कुणी जेवण मागितले तर त्याला नकार द्यायच्या. या दोघींच्या अशा वागणुकीवर अनेकांनी विविध तर्क लढवले होते.

दरम्यान, या दोघींवर कुणाची वाईट सावली आहे का असाही त्यांच्या कुटुंबाला संशय होता. बऱ्याचदा दोघींनी बालाजीला नेले होते. परंतु तिथून परतल्यानंतरही त्यांच्या वागणुकीत फार बदल होत नसे. या दोघी टोनी श्वानाला खूप प्रेम करत होत्या. जर श्वानाने काही खाल्ले नाही तर दोघीही जेवत नव्हत्या. श्वान आजारी पडल्यापासून या दोघी मानसिक तणावात गेल्या. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sisters' Isolated Lives End Tragically Due to Pet's Illness.

Web Summary : Lucknow sisters, Radha and Jia, deeply attached to their ill dog, committed suicide after struggling with its sickness. Isolated for six years and detached from society, their lives ended tragically due to the pet's failing health, police are investigating.