युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा ७० हजार कोटींनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 08:14 IST2026-05-19T08:14:41+5:302026-05-19T08:14:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम भारताच्या खत अनुदानावर होण्याची चिन्हे आहेत. आयात खर्च ...

The burden of fertilizer subsidy will increase by 70 thousand crores due to the war. | युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा ७० हजार कोटींनी वाढणार

युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा ७० हजार कोटींनी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम भारताच्या खत अनुदानावर होण्याची चिन्हे आहेत. आयात खर्च वाढल्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षात खत अनुदानाचा खर्च ७० हजार कोटींनी वाढून २.४१ लाख कोटींवर जाऊ शकतो, अशी माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा एस. शर्मा यांनी सांगितले की, संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी आणि वाहतूक खर्चावर दबाव वाढला आहे. त्यामुळे खतांच्या आयातीचा खर्च वाढत असून अनुदानाचा भारही मोठ्या प्रमाणात फुगण्याची शक्यता आहे.

खतांचा पुरवठा सध्या समाधानकारक 
आगामी खरीप हंगामासाठी खतांचा पुरवठा सध्या समाधानकारक असल्याचा दावा सरकारने केला आहे. देशाला ३९० लाख टन खतांची गरज असून पैकी ५१ टक्क्यांहून अधिक साठा उपलब्ध आहे. उर्वरित गरज आयातीद्वारे पूर्ण केली जात आहे.

खत अनुदानासाठीचा वाढता आर्थिक भार 
बाब        आकडेवारी
२०२६-२७ मधील खत अनुदान         २.४१ लाख कोटी रुपये
अर्थसंकल्पातील मूळ तरतूद        १.७१ लाख कोटी रुपये
संभाव्य अतिरिक्त भार        ७० हजार कोटी रुपये

खरीप हंगामात असणारी खतस्थिती आणि साठा
बाब        आकडेवारी
देशाची एकूण गरज    ३९० लाख टन 
उपलब्ध साठा    ५१% पेक्षा अधिक
सध्याचा खतसाठा    २००.९ लाख टन 
दररोजचे उत्पादन    ८० हजार टन 

खताची आयात आणि पुरवठा कसा आहे? 
बाब    आकडेवारी
पर्यायी मार्गांनी     २२ लाख टनांपेक्षा
आलेली खत आयात    अधिक
डीएपी पुरवठा करार    १३.५ लाख टन 
एनपीके कॉम्प्लेक्स 
पुरवठा    ७ लाख टन

Web Title : युद्ध से उर्वरक सब्सिडी का बोझ 70,000 करोड़ रुपये बढ़ने की आशंका

Web Summary : पश्चिम एशिया में बढ़ते तनाव से भारत की उर्वरक सब्सिडी का बोझ बढ़ने की आशंका है। आयात खर्च बढ़ने से 2026-27 में लागत 70,000 करोड़ रुपये बढ़कर 2.41 लाख करोड़ रुपये तक पहुंच सकती है। आगामी खरीफ सीजन के लिए उर्वरक की आपूर्ति वर्तमान में पर्याप्त है, जिसमें आवश्यक स्टॉक का 51% से अधिक उपलब्ध है।

Web Title : War to Increase Fertilizer Subsidy Burden by ₹70,000 Crore

Web Summary : Rising tensions in West Asia are expected to significantly increase India's fertilizer subsidy burden. Costs may surge by ₹70,000 crore in 2026-27, reaching ₹2.41 lakh crore due to increased import expenses. Fertilizer supplies for the upcoming Kharif season are currently adequate, with over 51% of the required stock available.

टॅग्स :Fertilizerखते