शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यातून सुटण्यासाठी दहशतवाद्यांची नवी क्लृप्ती

By admin | Updated: July 14, 2014 00:45 IST

सुरक्षा दलाने पकडले, तर वय १८ च्या खाली सांगा व स्वत:ची सुटका करून घ्या, असा नवा मंत्र लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये लढणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.

श्रीनगर/नवी दिल्ली : सुरक्षा दलाने पकडले, तर वय १८ च्या खाली सांगा व स्वत:ची सुटका करून घ्या, असा नवा मंत्र लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरमध्ये लढणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. लष्कर-ए-तोयबाच्या या नव्या कल्पनेची माहिती मोहंमद नवीद जट ऊर्फ अबू हंजाला याने दिली. जट याने त्याचे वय १७ च्या खालचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याचे नक्की वय कळण्यासाठी वय ठरविण्याची चाचणी घेण्यात आली. त्यात त्याचे वय २२ असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर त्याने आपल्या पाकिस्तानी मालकांनी वय १७ असल्याचे सांगण्यास बजावले होते असे म्हटले आहे. अल्पवयीन मुलांसाठी असणाऱ्या कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. जट हा पाकिस्तानातील मुलतान येथील रहिवासी आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पोलिसांनी त्याला दक्षिण काश्मीर येथे अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीनुसार आपल्या सहा सहकाऱ्यांसह तो आॅक्टोबर २०१२ मध्ये उत्तर काश्मीरमधील केरन सेक्टरमधून भारतात आला होता. त्याचे वडील लष्करातील निवृत्त वाहनचालक आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)